येत्या काळात अंधेरी स्टेशनचा कायापालट होणार! वर्ल्डक्लास सुविधांनी सुसज्ज वास्तू

त्या काही दिवसांमध्ये मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानकाचा कायापालट झालेला तुम्हाला दिसून येणार आहे. 

Updated: Jun 27, 2021, 10:28 PM IST
येत्या काळात अंधेरी स्टेशनचा कायापालट होणार! वर्ल्डक्लास सुविधांनी सुसज्ज वास्तू title=

मुंबई : येत्या काही दिवसांमध्ये मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानकाचा कायापालट झालेला तुम्हाला दिसून येणार आहे. स्टेशनला स्मार्ट आणि मॉडर्न बनवण्यात येणार आहे. भारतीय रेल्वे स्टेशन विकास निगम लिमिटेड (IRSDC ) दोन फेजमध्ये  स्टेशनचे पुनर्विकासाचे काम हाती घेणार आहे. यामुळे प्रवाशांना वर्ल्ड क्लास सुविधा मिळाणार आहेत.

अंधेरी रेल्वे स्टेशन 21 हजाराहून अधिक चौरस मीटरमध्ये पसरले आहे. या परिसरात पुनर्विकासाचे काम सुरू आहे. यासाठी वापरण्यात येणारे मॉडल डीबीएफओटी आहे. पुनर्विकासाचा एकूण परिसर 4.31 एकरचा आहे.  IRSDC अंधेरीच्याऐवजी दादर, कल्याण, ठाकुर्ली, वांद्रे, सीएसएमटी, ठाणे आणि बोरिवली स्टेशनचा पुनर्विकास करणार आहे.

प्रवेशाठिकाणी गर्दी कमी करण्यासाठी वार्सोवा मार्ग रोडवर ड्रॉप - ऑफ /  पिक - अप सोबतच स्टेशनमद्ये प्रवेशाची योजना बनवण्यात येणार आहे. मॉडर्न अंधेरी स्टेशन 100 टक्के दिव्यांग सुलभ असणार आहे. 

पश्चिम रेल्वेवरील सर्वात व्यस्त स्थानकांपैकी अंधेरी एक स्टेशन आहे. अंधेरी दोन रेल्वे मार्गांना सेवा देते. एक हार्बर लाईन आणि दुसरी पश्चिम लाईन...

वार्सोवा घाटकोपर  मेट्रो लाईन स्टेशनच्या पूर्वेला जवळच आहे. लांब पल्याच्या गाड्यांसाठी अंधेरी एक प्रमुख स्टेशन आहे.