Best Of Lata Mangeshkar : तुमच्या प्ले-लिस्टचा भाग असलीच पाहिजेत अशी लतादीदींची 10 सुपरहिट गाणी

पाहूयात लता दीदींची 10 सुपरहिट गाणी जी आजंही लोकप्रिय आहेत

Updated: Feb 6, 2022, 11:40 AM IST
Best Of Lata Mangeshkar : तुमच्या प्ले-लिस्टचा भाग असलीच पाहिजेत अशी लतादीदींची 10 सुपरहिट गाणी title=

मुंबई : भारतरत्न विजेत्या आणि देशाची गानकोकिळा अशी ओळख असणाऱ्या लता मंगेशकर आज काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात त्यांचं आज सकाळी निधन झालं आहे. लता दीदींच्या जाण्याने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. गेल्या 8 दशकांपासून लता दीदींच्या आवाजाच्या जादूचे सर्वजण चाहते होते. 

पाहूयात लता दीदींची 10 सुपरहिट गाणी जी आजंही लोकप्रिय आहेत-

जब प्यार किया तो डरना क्या

जब प्यार किया तो डरना क्या हे गाणं लता मंगेशकर यांच्या सर्व हिट गाण्यांपैकी एक आहे. मुगल-ए-आजम या सिनेमातील हे लोकप्रिय गाणं आहे.

भीगी भीगी रातों में

अजनबी सिनेमातील या गाण्याने लोकांवर एक वेगळीच जादू केली होती. लता मंगेशकर यांच्या सुपरहिट गाण्यांपैकी हे एक गाणं आहे. आजंही दीदींचे चाहते हे गाणं फार आवडीने ऐकतात.

तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं

आंधी सिनेमातील हे गाणं लता मंगेशकर यांनी केलं होतं. आजंही तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं या गाण्याला लोकांची मोठी पसंती दिसून येते.

जाने कैसे कब कहां इकरार

शक्ति सिनेमातील या गाण्याला लोकांची खूप पसंती मिळाली होती. लता मंगेशकर यांनी या गाण्याला आवाज दिला होता

लग जा गले

लता मंगेशकर यांचं हे गाणं खूप हिट ठरलं होतं. वो कौन थी सिनेमातील लता मंगेशकर यांचं हे गाणं खूपचं हिट ठरलं होतं.

एक प्यार का नगमा है

शोर सिनेमातील 'एक प्यार का नगमा है' हे गाणं लोकांच्या खूप आवडीचं आहे. लता मंगेशकर यांचं हे गाणं आजंही लोकं गुणगुणताना दिसतात.

तूने ओ रंगीले

लता मंगेशकर यांच्या हिट गाण्यांपैकी अजून एक गाणं म्हणजे तूने ओ रंगीले हे गाणं. कुदरत सिनेमातील या गाण्याला लता मंगेशकर यांनी आवाज दिला होता. या गाण्यात हेमा मालिनी आणि राजेश खन्ना होते.

माई नी माई

हम आपके हैं कौन या सिनेमातील माई नी माई हे गाणं फार लोकप्रिय झालं होतं.

दिल तो पागल है

दिल तो पागल है या सिनेमाचं हे टायटल ट्रॅक होतं. हे गाणं खास लता मंगेशकर यांनी गायलं होतं. 

मेरे ख्वाबों में जो आए

सुपरहिट सिनेमा दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मधील हिट गाणं होतं. आजच्या तरूणाईला देखील हे गाणं फार आवडतं.