विनायक मेटे यांच्या गाडीला मोठा अपघात; मेटे गंभीर जखमी असल्याची माहिती

आज पहाटे 5:30 वाजता भाताण बोगद्या जवळ हा अपघात झाल्याची माहिती आहे.

Updated: Aug 14, 2022, 01:17 PM IST
विनायक मेटे यांच्या गाडीला मोठा अपघात; मेटे गंभीर जखमी असल्याची माहिती title=

रायगड : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीला मोठा अपघात झाला आहे. या अपघातात विनायक मेटे गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे-वर ही घटना घडली. आज पहाटे 5:30 वाजता भाताण बोगद्या जवळ हा अपघात झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेटे यांच्या गाडीने अनोळखी वाहनाला धडक दिल्याची माहिती आहे.

या भीषण अपघातात विनायक मेटेंसह सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. पनवेलच्या एमजीएम रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.