शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बॉलिवूडमधूनही मोठा पाठिंबा

देशात शेतकऱ्यांकडून कृषी कायद्याला (New Farm Laws) तीव्र विरोध होत आहे. शेतकऱ्यांचे दिल्लीत आंदोलन (Farmers Protest) सुरु आहे. या आंदोलनाला आता बॉलिवूडमधूनही (Bollywood) मोठा पाठिंबा मिळत आहे. 

Updated: Dec 8, 2020, 12:23 PM IST
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बॉलिवूडमधूनही मोठा पाठिंबा  title=
Pic Courtesy : twitter

मुंबई : देशात शेतकऱ्यांकडून कृषी कायद्याला (New Farm Laws) तीव्र विरोध होत आहे. शेतकऱ्यांचे दिल्लीत आंदोलन (Farmers Protest) सुरु आहे. केंद्र सरकारबरोबर पाच चर्चेच्या फेऱ्या झाल्या. मात्र, तोडगा काही निघू शकलेला नाही. त्यामुळे शेतकरी अधिक आक्रमक झाले आहेत. आज भारत बंदची (Bharat Bandh) हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाला चांगला पाठिंबा मिळत आहे. अनेकांनी पाठिंबा देत आपले व्यवहार सुरु ठेवले आहेत. दरम्यान, दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता बॉलिवूडमधूनही (Bollywood) मोठा पाठिंबा मिळत आहे. ख्यातनाम अभिनेत्री प्रियंका चोप्रा, सोनम कपूर, प्रिटी झिंटा, तापसी पन्नू या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत.

प्रियंका चोप्रा हिने म्हटले आहे, आमचे शेतकरी भारताचे अन्न सैनिक आहेत. त्यांची भीती कमी करण्याची गरज आहे. त्यांच्या अपेक्षांची पूर्तता होणे आवश्यक आहे. एक मजबूत लोकशाही म्हणून आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की, लवकरात लवकर हे संकट दूर होईल

दुसरीकडे अभिनेत्री प्रीती झिंटाने शेतकऱ्यांना सैनिक म्हणत त्यांच्या आंदोलनाला समर्थन दिले आहे. प्रीतीने ट्वीट करताना म्हटले आहे, 'या कडाक्याच्या थंडीत आणि करोना महामारीमध्ये आंदोलन करणारे शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय पाहून माझ्या जीवाचं पाणी होत आहे. ते आपला देश चालवणारे मातीचे सैनिक आहेत. शेतकरी आणि सरकार यांच्यात सुसंवाद होईल अशी मला मनापासून आशा आहे. लवकरच सकारात्मक निर्णय निघेल आणि सर्वांचे समाधान होईल.'