भाजपाच्या कोअर कमिटीची आज बैठक

विरोधकांचे आव्हान, हिवाळी अधिवेशनातील रणनिती यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. 

Updated: Nov 13, 2017, 01:11 PM IST
 title=

मुंबई : भाजपाच्या कोअर कमिटीची आज बैठक होत आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, जनतेमध्ये सरकारविरोधी वाढू लागलेली नाराजी, विरोधकांचे आव्हान, हिवाळी अधिवेशनातील रणनिती यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. 

कोअर कमिटी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, एकनाथ खडसे आदी नेते या कोअर कमिटीच्या बैठकीला हजर राहणार आहेत. 

राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावरही चर्चा

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार आणि नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबतही चर्चेची शक्यता आहे, मात्र मंत्रीमंडळ विस्तार लांबणीवर पडण्याची चिन्हं आहेत. शिवसेनेच्या भूमिकेवरही चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.