बुलेट ट्रेन दर आणि वैशिष्ट्ये!

तुम्ही सर्वसामान्य मुंबईकर असाल आणि तुम्ही हे आकडे पहात असाल तर, तुमचेही डोळे गरगरल्याशिवया राहणार नाहीत. तर, मग घ्या जाणून बुलेट ट्रेनची वैशिष्ट्ये आणि तिकीट दर.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Feb 20, 2018, 11:27 AM IST
बुलेट ट्रेन दर आणि वैशिष्ट्ये! title=

मुंबई : मुंबईमध्ये 'बुलेट ट्रेन' धावणार आणि त्यामुळे नेहमीच्या लोकलमधील घामट गर्दी आणि फुकट जाणारा वेळ यापासून सुटका होणार, अशा स्वप्नरंजनात जर तुम्ही असाल तर, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. 

कागदावर असलेली बुलेट ट्रेन रस्त्यावर धावायला अद्याप अवकाश असला तरी, बुलेट ट्रेनच्या तिकीट दरांच्या चर्चांनी मात्र चांगलाच वेग धरला आहे. प्रसारमाध्यमातून पुढे येत असलेले बुलेट ट्रेनच्या तिकीट दराचे आकेडे मोठे धक्कादायक आहेत. तुम्ही सर्वसामान्य मुंबईकर असाल आणि तुम्ही हे आकडे पहात असाल तर, तुमचेही डोळे गरगरल्याशिवया राहणार नाहीत. तर, मग घ्या जाणून बुलेट ट्रेनची वैशिष्ट्ये आणि तिकीट दर.

वाहनांनी खचाखच भरलेले रस्ते, त्यामुळे जाणार वेळ, त्यावर मार्ग काढण्यासाठी उपयुक्त असा लोकल प्रवास, त्यातील गर्दी आणि या सर्वांतूनच पुन्हा वेग मिळावा यासाठी सुरू करम्यात आलेल्या मेट्रो ट्रेन. हा सर्व इतिहास आणि वर्तमान सर्वच मुंबईकरांना माहिती आहे. पण यावर मार्ग म्हणून बुलेट ट्रेन किती फायदेशीर ठरू शकेल, याबाबत उत्सुकता आहे.

बुलेट ट्रेन वैशिष्ट्ये

- मुंबई ते अहमदाबाद अशी भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचा मार्ग.
-कॉरिडॉरची लांबी ५०६ किलो मीटर
- प्रकल्प पुर्णत्वाला जाण्यासाठी तब्बल १ लाख १०,००० कोटी रूपयांची आवश्यकता.
- बुलेट ट्रेनसाठी जायकाडन सुमारे ८८००० कोटी रूपयांचा निधी

बुलेट ट्रेन एकेरी प्रवासाचे तिकीट दर

-बीकेसी-विरार ५०० रूपये. प्रवासासाठी लागणारा कालावधी -२४ मिनीटे.
-बीकेसी-भोईसर ७५० रूपये. प्रवासासाठी लागणारा कालावधी - ३९ मिनीटे.
-बीकेसी-ठाणे २५० रूपये. प्रवासासाठी लागणारा कालावधी - १० मिनीटे