मुख्यमंत्र्याच्या कोपरखळीला शिवसेनेचे जोरदार प्रत्युत्तर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोपरखळीला शिवसेनेनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्याच्या मनातले बोलून दाखवल्याले असल्याचे ट्विट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेय. शिवाय उपहासात्मक शब्दात फडणवीसांचं अभिनंदनही केले आहे. 

Updated: Oct 24, 2017, 09:58 AM IST
मुख्यमंत्र्याच्या कोपरखळीला शिवसेनेचे जोरदार प्रत्युत्तर title=

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोपरखळीला शिवसेनेनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्याच्या मनातले बोलून दाखवल्याले असल्याचे ट्विट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेय. शिवाय उपहासात्मक शब्दात फडणवीसांचं अभिनंदनही केले आहे. 

दिवाळी संपल्यानंतर शिवसेना-भाजपमध्ये एकमेकाविरोधी फटाके फुटायला सुरुवात झाली आहे.  मुखपत्र सामनात आज सकाळी भाजपचा समाचार घेण्यात आलाय. यवतमाळ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नाव न घेता जोरदार टीका केली होती. या टीकेला तात्काळ शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आलेय. त्यामुळे शिवसेना-भाजपता पुन्हा दरी पडल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे.

गुजरातचे ओबीसी समाजाचे नेते अल्पेश ठाकोर यांचे दुपारी ट्विटरच्या माध्यमातून अभिनंदन आणि शुभेच्छा देत शिवसेनेला भाजपला डिवचले. संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचा पुरेपूर वचपा काढला. म्हटले कपटी मित्रापेक्षा दिलदार विरोधक बरा, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा उल्लेख केला. मुख्यमंत्र्यांच्या वचप्याला शिवसेनेने रात्री ताबडतोब उत्तर दिले.