मुख्यमंत्र्यांची पूरग्रस्त भागासाठी भरीव मदतीची घोषणा

पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर

Updated: Aug 19, 2019, 04:52 PM IST
मुख्यमंत्र्यांची पूरग्रस्त भागासाठी भरीव मदतीची घोषणा title=

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवील यांनी वर्षा बंगल्यांवर पत्रकार परिषद घेत पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर केली आहे. अडीच तास चाललेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पुरामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे एक हेक्टर पर्यंत जेवढे कर्ज मिळते ते कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले नाही मात्र नुकसान झाले आहे. तेव्हा जी नियमाने भरपाई मिळते त्याच्या तीनपट भरपाई दिली जाणार आहे. जी घरे पडली आहे, शतीग्रस्त आहेत त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे बांधून मिळतील आणि एक लाख रुपयांची मदत ही मिळणार आहे. ज्यांची घरे पडली आहे, त्यांना भाड्याने राहण्यासाठी सरकार 24 हजार रुपये (ग्रामीण) आणि 36 हजार (शहर) रुपये दिले जाणार आहेत. जनावरांच्या गोठ्या करता मदत करण्याचा निर्णय ही घेण्यात आला आहे.

निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन इनकम टॅक्स भरण्याची मुदत वाढवून द्यावी, GST बाबत काही वेळ द्यावा, ज्यांनी कर्ज घेतले आहे त्यांना 6 महिने कर्ज रिशेड्यूल करून घ्यावे अशी विनंती करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

पुरासारखी घटना घडू नये यासाठी काय उपाययोजना कराव्यात यासाठी माजी जलसंपदा सचिव नंदकुमार वडनेरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणार आहेत. 

छोटे व्यापाऱ्यांना झालेल्या नुकसानीच्या भरपाईची 50 टक्के मात्र जास्तीत जास्त 50 हजार रुपये देणात येणार आहेत. कृषीपंपाची वसुली पुढील 3 महिने होणार नाही. राज्याचा मदतीचा प्रस्ताव हा केंद्राला आज पाठवला आहे, ज्या फॉरमॅटमध्ये आवश्यक असतो त्या प्रकारे पाठवण्यात आला आहे. असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.