कर्नल प्रसाद पुरोहित उद्यापासून आर्मीच्या सेवेत?

मालेगाव बॉम्बस्फोटातला आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित उद्यापासून संरक्षण खात्याच्या सेवेत पुन्हा रूजू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

Updated: Aug 23, 2017, 07:59 PM IST
कर्नल प्रसाद पुरोहित उद्यापासून आर्मीच्या सेवेत? title=

मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोटातला आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित उद्यापासून संरक्षण खात्याच्या सेवेत पुन्हा रूजू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. जामिन मिळाल्यानंतर संरक्षण खात्याच्या व्याख्येनुसार ओपन अरेस्टमध्ये असलेला कर्नल प्रसाद पुरोहितची संरक्षण खात्यातली औपचारिकता आज पूर्ण झाली आहे. त्यामुळे उद्यापासून संरक्षण खात्याचा गणवेश घालून पुरोहित पुन्हा सेवेत दाखल होणार असल्याची माहिती संरक्षण खात्याच्या एका अधिका-याने नाव न घेण्याच्या अटीवर दिलीये.

मालेगाव स्फोटातले आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित यांना जामीन मंजूर झाल्यावर त्यांची आज तळोजा तुरुंगातून सुटका झाली. पुरोहितच्या सुटकेच्यावेळी त्यांचे कुटुंबिय सुद्धा तळोजा तुरुंगात उपस्थित होते.