विमान प्रवास आणि शताब्दी-राजधानीत आता 'कन्टेन्ट ऑन डिमांड'

विमान प्रवासासारखा आता रेल्वेच्या प्रवासातही प्रवाशांना मनोरंजनाचं साधन मिळणार आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 14, 2020, 11:53 PM IST

मुंबई : विमान प्रवासासारखा आता रेल्वेच्या प्रवासातही प्रवाशांना मनोरंजनाचं साधन मिळणार आहे. शताब्दी आणि राजधानी एक्स्प्रेससारख्या प्रिमियम रेल्वे गाड्यांमध्ये संगीत ऐकता येणार आहे. एवढंच नाही तर सिनेमा देखील पाहायला मिळणार आहे. कंटेंट ऑन डिमांड ही सुविधा लवकरच सुरु करण्यात येणार आहे. यासाठी डिजिटल एंटरटेंनमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून मेसर्स मार्गो या कंपनीची निवड करण्यात आली आहे. 

मेसर्स मार्गो की कंपनी झी एंटरटेन्मेंट कंपनीची सहाय्यक कंपनी आहे. मुव्ही आणि म्युझिक ऑन डिमांड या सेवेमुळे प्रवाशांचा प्रवास आनंददायी होणार आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांना आरामात आवडीचा सिनेमा किंवा आवडीचं संगीत ऐकायला मिळणार आहे.