CORONA UPDATE : काळजी घ्या! महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाची रुग्णसंख्या वाढतेय

गेल्या काही दिवसात राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या हजाराच्या आत  होती

Updated: Nov 10, 2021, 08:55 PM IST
CORONA UPDATE : काळजी घ्या! महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाची रुग्णसंख्या वाढतेय title=

मुंबई : राज्यात दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत (Corona Cases in Maharashtra) चढउतार पाहिला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून हजारच्या आत असलेल्या रुग्णसंख्येत आज पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात 1 हजार 94 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात मृत्यूदर 2.12 टक्के इतका झाला आहे. गेल्या चोवीस तासात 1976 जण बरे होऊन घरी गेले आहेत. 

राज्यात आतापर्यंत 64 लाख 63 हजार 932 जणांनी कोरोनावर मात केली असून राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 97.64 टक्के इतकं झालं आहे. राज्यात सध्या 12 हजार 410 सक्रीय रुग्ण आहेत. सध्या 1 लाख 29 हजार 714 व्यक्ती होम क्वारंटाईन असून 870 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

मुंबईतही रुग्णसंख्येत वाढ

मुंबईतही (Corona Cases in Mumbai) गेल्या काही दिवसांपासून तीनशेच्या आत रुग्णसंख्या होती. गेल्या चोवीस तासात मुंबईत 347 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासात 363 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिक्वहरी रेट 97 टक्क्यांवर पोहचला आहे. मुंबईत सध्या 3 हजार 326 सक्रीय रुग्ण आहेत.