Devendra Fadnvis : ते पुन्हा आलेच, पण उपमुख्यमंत्री म्हणून, देवेंद्र फडणवीस राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी

देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnvis) अखेरच्या क्षणी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. 

Updated: Jun 30, 2022, 08:13 PM IST
Devendra Fadnvis : ते पुन्हा आलेच, पण उपमुख्यमंत्री म्हणून, देवेंद्र फडणवीस राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी title=

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnvis) अखेरच्या क्षणी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी फडणवीस यांना शपथ दिली. पक्षश्रेष्ठी जे पी नड्डा आणि आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आग्रहानंतर अखेर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. (devendra fadnvis taking oath as a deputy chief minister of maharashtra state) 

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनी राजभवनात सत्तास्थापनेचा दावा केला. यानंतर राजभवनातच पत्रकार परिषद घेण्यात आली. फडणवीस यांनी आधी या पत्रकार परिषदेला संबोधित केलं. यावेळेस फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव जाहीर केलं. सोबत स्वत: मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र यानंतर नवा ट्विस्ट आला. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी ट्विट आणि करत आणि माध्यमांसमोर येत फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावं, असा आग्रह केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देवेंद्र यांना 2 वेळा फोनद्वारे संपर्क साधल्याचं समोर आलं. यानंतर अखेर फडणवीस यांनी मंत्रिमंडळात सहभागी होणार असल्याचा निर्णय घेतला. त्यानुसार फडणवीस यांनी अखेर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.