डोंबिवलीत 'बटाटावड्यां'चा अनोखा विक्रम, 'लिम्का' घेणार नोंद

बटाटावडा हा मुंबईकरांचा विक पॉईँट... 

Updated: Dec 28, 2019, 08:58 PM IST
डोंबिवलीत 'बटाटावड्यां'चा अनोखा विक्रम, 'लिम्का' घेणार नोंद title=

आतिष भोईर, झी २४ तास, डोंबिवली : बटाटावडा हा मुंबईकरांचा विक पॉईंट... याच बटाटावड्यानं मुंबईचं नाव लिम्का बुकमध्ये नेलंय. बटाटावड्याची चव चाखली नाही असा मुंबईकर तुम्हाला शोधून सापडणार नाही. बटाटावडा हा मुंबईकरांचा विक पॉईँट... घराबाहेर पडलेला मुंबईकर बटाटेवडे खाताना दिसतील... हाच वडा जगभरात पोहचावा यासाठी विश्वविक्रमी बटाटावड्य़ाचा घाट घालण्यात आला. 

१२ तासांत तब्बल २५ हजार वडे तळण्याचा विक्रम सोडण्यात आला. कढयांमध्ये वडे सोडण्यात येत होते. एकीकडे वड्यांचे गोळे तयार केले जात होते. दुसरीकडे वडे कढईत सोडले जात होते. खमंग वड्यांचा दरवळ सगळीकडं सुरु होता. कल्याण डोंबिवलीच्या महापौर विनिता राणेही या विश्वविक्रमी उपक्रम पाहण्यासाठी आल्या होत्या.

४५ मिनिटांना १ हजार वडे तळण्याचा वेग सतेंद्र जोशी यांनी गाठलेला आहे. तळलेले वडे गोरगरीब विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. पिवळेधम्मक, चवदार, खुसखुशीत बटाटेवड्यांमुळे डोंबिवलीचं आणि भारताचं नाव जगात झालंय.