Anil Parab | परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस

याबाबतची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करत दिली आहे.

Updated: Aug 29, 2021, 06:55 PM IST
 Anil Parab | परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस title=

मुंबई : भाजपच्या जनआशिर्वाद यात्रेमुळे शिवसेना-भाजप यांच्यातील वाद चांगलाच टोकाला गेला. त्यानंतर आता परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना सक्तवसूली संचालयाने अर्थात ईडीने (Enforcement Directorate) नोटीस पाठवली आहे. याबाबतची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करत दिली आहे. यामुळे आता या ईडीच्या नोटीसीमुळे पुन्हा एकदा दोन्ही पक्ष आमनेसामने येणार असल्याची चिन्हं आहेत. (enforcement directorate notice to Transport Minister Anil Parab)

नोटीस कशासाठी? 

माजी गृहंमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणामध्ये सचिन वाझेने अनिल परब यांचंही नाव घेतलं होत. या आरोपांबाबत चौकशी करण्यासाठीच ईडीने ही नोटीस बजावली आहे. त्यानुसार अनिल परबांना मंगळवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित रहावे लागणार आहे. 

वरचे सरकार कामाला लागले- संजय राऊत

संजय राऊत यांनी या नोटीसीवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. "शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली . वरचे सरकार कामाला लागले.  भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत.chronology कृपया समज लिजीये", असं ट्विट राऊतांनी केलंय. तसेच आम्हीही कायदेशीर लढाई कायदयानेच लढू, जय महाराष्ट्र, असंही राऊतांनी स्पष्ट केलंय. 

अरविंद सावंत काय म्हणाले? 

"शिवेसेना खासदार अरविंद सावंत यांनीही या संदर्भात झी 24 तासला प्रतिक्रिया दिली. अनिल परब हे कडवट आणि धडाडीचे शिवसैनिक आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपला पोटशूल उठलंय. भाजप सुडाचं राजकारण करतंय. मी माझ्या राजकीय कारकिर्दीत इतकं गलिच्छ राजकारण पाहिलेलं नाही. तुम्ही भाजपात आले तर देशभक्त तर दुसऱ्याकडे राहिले तर देशद्रोही", असं म्हणत सावंतांनी भाजपवर हल्लाबोल केला.