आनंदराव अडसूळ यांचा शिवसेना नेतेपदाचा राजीनामा, हे दिलं कारण

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ शिंदे गटाच्या वाटेवर?

Updated: Jul 6, 2022, 09:44 PM IST
आनंदराव अडसूळ यांचा शिवसेना नेतेपदाचा राजीनामा, हे दिलं कारण title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. आनंदराव अडसूळ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राजीनाम्याचं पत्र पाठवून दिलं आहे. अडचणीच्या काळात पक्ष आणि नेतृत्व पाठिशी न राहिल्याची भावना आनंदराव अडसूळ यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे.

ईडीने केलेल्या कारवाईवेळी तसंच आजारपणात पक्ष नेतृत्वाकडून विचारपूसही करण्यात आली नाही अशी खंत आनंदराव अडसूळ यांनी व्यक्त केली आहे.

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु आहे. दरम्यान, आनंदराव अडसुळ यांचा मुलाग अभिजीत अडसूळ हा आधीच एकनाथ शिंदे गटासोबत आहे. त्यामुळे आनंदराव अडसूळही शिंदे गटाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे.