ठाकरे गटाची शपथपत्रं बोगस? 4 जिल्ह्यांत मुंबई क्राईम ब्रांचचा तपास

कथित बनावट शपथपत्रांवरुन ठाकरे अडचणीत?

Updated: Oct 12, 2022, 10:28 PM IST
ठाकरे गटाची शपथपत्रं बोगस? 4 जिल्ह्यांत मुंबई क्राईम ब्रांचचा तपास title=

Maharashtra Politics : ठाकरे गटानं (Thackeray Group) सादर केलेली शपथपत्रं (Affidavit) संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. ठाकरे गटाकडून देण्यात आलेली चार हजार शपथपत्रं बोगस असल्याचा आरोप शिंदे गटानं (Shinde Group) केला होता. त्यानंतर कथित बोगस शपथपत्रांप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कारवाई सुरु केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथकं (Mumbai Police Crime Branch) कोल्हापूर, पालघर, अहमदनगर, नाशिक या चार जिल्ह्यात तपास करत आहेत. कोल्हापूर पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयात मुंबई क्राईम ब्रांचची या बोगस शपथपत्रांप्रकरणी महत्त्वाची बैठकही झाली

या कथित बोगस शपथपत्रांवरुन शिंदे-ठाकरे गट (Shinde Group vs Thackeray Group) आमनेसामने आलेत. 70% पदाधिकारी आपल्याकडे असल्याचा दावा शिंदे गटानं केलाय तर शिंदेंविरोधात ज्या जिल्ह्यांमध्ये आंदोलनं झाली तिथे पोलिसी कारवाईचा धाक दाखवला जात असल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय. 

काही दिवसांपूर्वी मुंबईच्या वांद्रे इथं 4600 बनावट प्रतिज्ञापत्र सापडली होती. ही शपथपत्रं ठाकरे गटासाठी तयार केली जात असल्याचा आरोप शिंदे गटानं केला होता. नोटरी करणारी व्यक्तीच प्रतिज्ञापत्र भरुन देत असल्याचा दावा शिंदे गटानं केला होता. 

खरी शिवसेना कुणाची याचा वाद निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात आहे. त्यादृष्टीनं ही शपथपत्रं अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यामुळेच याप्रकरणी आता मुंबई क्राईम ब्रांचनं तपास हाती घेतलाय. त्यामुळे लवकरच सत्य समोर येईल अशी अपेक्षा आहे.