फास्ट न्यूज, संध्याकाळ, १० मे २०१८

Updated: May 10, 2018, 07:53 PM IST

१)पालघर लोकसभा पोटनिवडणूकीत शिवसेनेला शह देण्यासाठी भाजप काँग्रेसला गळ,पलूस कडेगावच्या बदल्यात  पालघरमध्ये माघार घेण्याची काँग्रेसला विनंती, शक्तीप्रदर्शनासह अर्ज दाखल२) पलूस कडेगाव निवडणुकीत  शिवसेनेचा काँग्रेसला पाठिंबा, विश्वजित कदम आणि उद्धव ठाकरेंची फोनवरून चर्चा, शिवसेना उमेदवार देणार नाही३) सव्वा दोन वर्षानंतर छगन भुजबळ स्वगृही परतले, पडत्या काळात सामानतल्या शब्दांनी आधार दिला, भुजबळांचं भाऊक विधान, घरी परतल्यावर आकाश मोकळं झाल्याची भावना४)कर्नाटकातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका, चीनमध्ये जाऊन मोदींचं डोकलामवर मौन का? राहुल गांधीचा मोदींना सवाल, केंद्रातले २० मंत्री कर्नाटकाच्या मैदानात५) मुंब्रा-शीळफाटा रस्ता बंद असल्यानं एरोली-ठाणे-बेलापूर रस्त्यांवर वाहतूकीची कोंडी...ऐरोली शहरात वाहनांच्या रांगाच रांगा..उड्डाण पुलांच काम सुरु असल्यानं वाहतुकीवर परिणाम६) नवी मुंबई विमानतळाची 2019ची डेडलाईन चुकणार, कामाच्या प्रचंड आवाक्यामुळे 2020 पर्यंत काम पुर्ण होण्याची शक्यता, विमान वाहतूक सचिवांची कबुली७) औरंगाबादमध्ये आठ लाखांचं वीज बिल आल्याने हताश झालेल्या जगन्नाथ शेळकेंनी केली आत्महत्या,महावितरणाचा अधिकारी निलंबित ८) अकोला जिल्ह्यातलं धोतर्गी गाव तिहेरी हत्याकांडनं हादरलं...जन्मदात्या बापानंच केला तिन्ही लेकरांचा खून....हत्येनंतर विष्णू इंगळेचा आत्महत्येचा प्रयत्न९) जभरातील फॅशनची पंढरी मानल्या जाणा-या कान्स उत्सवाला सुरुवात...कान्स रेड कार्पेटवर प्रथमच उतरलेल्या कंगनाचा रेट्रो लूक...तर कंगनाबरोबर हुमा कुरेशीचाही सहभाग आणि १०) भारत गणेशपुरे पुन्हा बोहल्यावर चढले...18 वर्षांनी पुन्हा त्याच पत्नीशी रेशीमगाठीत अडकले.