बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू

बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे.

shailesh musale Updated: Mar 26, 2018, 02:33 PM IST
बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू title=

संगमनेर : बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. संगमनेर तालुक्यातील मालदाड गावात ही दुदैवी घटना घडली आहे. अश्विनी सिताराम कडाळे या चिमुकलीचा यामध्ये दुदैवी मृत्यू झाला आहे. आई समोरच बिबट्याने मुलीवर हल्ला केला. पण आईला काहीच करता आलं नाही.

आतापर्यंत अनेक अशा घटना समोर आल्या आहेत.शहरी भागात बिबट्या दिसल्याचे प्रमाण वारंवार समोर येत आहेत. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण आहे. नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत आहे.