Gold Price Today | सोन्याची चाल महागाईकडे! जाणून घ्या एका आठवड्यातील वाढ

 सोने चांदीच्या दरात तेजी वाढायला लागली आहे. MCXवर सोन्याचा भाव 47 हजाराच्या पार गेला आहे. सराफा बाजार देखील दिवसेंदिवस महाग होताना दिसत आहे. 

Updated: Apr 16, 2021, 12:23 PM IST
Gold Price Today | सोन्याची चाल महागाईकडे! जाणून घ्या एका आठवड्यातील वाढ title=

 मुंबई : सोने चांदीच्या दरात तेजी वाढायला लागली आहे. MCXवर सोन्याचा भाव 47 हजाराच्या पार गेला आहे. सराफा बाजार देखील दिवसेंदिवस महाग होताना दिसत आहे. असं असलं तरी आज मुंबईतील सोन्याच्या दरात फारसा बदल झालेला नाही. 

  MCX GOLD : गुरूवारी मार्केटमध्य़े सोन्याचा भाव 560 रुपये तोळा महाग होऊन 47175 रुपयांवर पोहचला. परंतु आज त्यात 100 रुपयांपेक्षा जास्तची घट झाल्याचे दिसून आले आहे.

 या संपूर्ण आठवड्यात सोन्याच्या दरांवर नजर टाकली तर लक्षात येते की, सोने 650 रुपयांनी महागले आहे.

 सर्वोच्च स्थरापेक्षा 9200 रुपये स्वस्त

 गेल्यावर्षी कोरोना संकटामुळे लोकांनी सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. ऑगस्ट 2020 मध्ये दर तोळ्यामागे सोन्याचा  भाव 56 हजाराहून अधिक झाला होता. सध्या सोने 47 हजाराच्या जवळपास ट्रेड करीत आहे. त्यामुळे सर्वोच्च स्थरापेक्षा अजूनही 9000 हून कमी किंमतीत सोन्याचा भाव सुरू आहे.