'जीएसटी'मुळे बेरोजगारीत वाढ होण्याची शक्यता

 देशातल्या छोट्या आणि मध्यम व्यापाऱ्यांना जीएसटी प्रणालीच्या अंमलबाजणीत येणाऱ्या अडचणींनी सरकारची झोप उडवल्याचं आता स्पष्ट होतंय.

Updated: Sep 28, 2017, 12:31 PM IST
'जीएसटी'मुळे बेरोजगारीत वाढ होण्याची शक्यता title=

मुंबई : देशातल्या छोट्या आणि मध्यम व्यापाऱ्यांना जीएसटी प्रणालीच्या अंमलबाजणीत येणाऱ्या अडचणींनी सरकारची झोप उडवल्याचं आता स्पष्ट होतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल सनदी अधिकाऱ्यासोबत बैठक झाली.

 महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना व्यापारी आणि उद्योजकांशी प्रत्यक्ष संवाद साधला, आणि त्यांच्या जीएसटीविषयीच्या अडचणी सोडवण्याच्या सूचना दिल्या आहेत.  स्थानिक सनदी अधिकाऱ्यांनी जीएसटी यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी असं आवाहनही मोदींनी केलं.    

१ जुलैपासून अंमलात आलेली नवी करप्रणाली दोन महिन्यानंतरही म्हणावी तितकी स्थिर झालेली नाही. 

तांत्रिक अडचणींमुळे देशभरातले लहान मोठे व्यापरी उद्योजक त्रस्त आहेत. नोटबंदीनंतर आता जीएसटीत येणाऱ्या अडचणींमुळे सरकारची प्रतिमा आणखी ढासळते आहे. त्यामुळे लवकरात लवकर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी पंतप्रधान मोदींनीच सूत्र हाती घेतल्याचं दिसतंय.