'कोरोनाशी लढण्यासाठी दोन दिवसात लॅब आणि डॉक्टरांची संख्या वाढवणार'

कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाचे ८० संशयित रुग्ण दाखल 

Updated: Mar 15, 2020, 05:05 PM IST
'कोरोनाशी लढण्यासाठी दोन दिवसात लॅब आणि डॉक्टरांची संख्या वाढवणार' title=

मुंबई : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नुकताच कस्तुरबा गांधी रुग्णालयाचा आढावा घेतला. यावेळी राज्य शासनाने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांची त्यांनी माहिती दिली. कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाचे ८० संशयित रुग्ण दाखल आहेत.  कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभुमीवर सरकारी रुग्णालयात नव्या लॅब सुरु करण्यात येणार आहेत. राज्यभरात दोन दिवसात लॅब आणि डॉक्टरांची संख्या वाढवणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. 

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ३२ वर गेली आहे. केईएममध्ये बुधवारपासून नवी मशिन आणि सुविधा सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे तिथे देखील रुगण चाचणीची क्षमता वाढणार आहे. १५ ते २० दिवसांच्या आत नवी लॅब सुविधा, प्रशिक्षण पुरवण्यात येणार आहे. महिन्याभरात मिरज, सोलापूर, धुळे, औरंगाबाद इथे लॅब उभारण्यात येणार आहेत. सेव्हन हिल्समध्ये ४०० बेड्स तयार करण्यात आले आहेत. एमपीएससी परीक्षा ३० मार्चनंतर घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. 

रोज ३५० नमुने तपासणे शक्य होणार आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. पण संसर्गजन्य आजार इम्युनिटीने कमी करता येतात. शासन आणि डॉक्टरांनी दिलेले निर्देश पाळा. इन्फेक्शन पसरु नयेत यासाठी घेतलेल्या निर्णयांचे पालन करा असे देखील टोपे यांनी सांगितले