एक व्यक्ती किती सोने स्वतःजवळ ठेऊ शकतो? कायद्यात काय आहेत तरतूदी? वाचा

 तुम्ही जवळ किती सोने बाळगू शकता. कायदा काय म्हणतो याबाबतची माहिती आपण या लेखात घेणार आहोत

Updated: May 23, 2021, 04:19 PM IST
एक व्यक्ती किती सोने स्वतःजवळ ठेऊ शकतो? कायद्यात काय आहेत तरतूदी? वाचा title=

मुंबई : सोने फक्त गुंतवणूकीसाठी नाही तर, आनंदासाठी देखील खरेदी केले जाते. अक्षय तृतीया असो किंवा धनतेरस किंवा लग्नसराई सोने खरेदीसाठी अनेक निमित्त असतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याच्या घसरलेल्या किंमती गुंतवणूकीची संधी आहे. सोने हे भारतीयांच्या गुंतवणूकीसाठी सर्वात आवडता पर्याय आहे. परंतु तुम्ही जवळ किती सोने बाळगू शकता. कायदा काय म्हणतो याबाबतची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

नियम काय म्हणतात?
इनकम टॅक्स ऍक्ट 1961 च्या सेक्शन 132 नुसार टॅक्स अधिकारी तुमच्याकडे मर्यादेपेक्षा अधिक सोने असल्यास ते जप्त करू शकतात. कायद्यात एखादी व्यक्ती आपल्याकडे किती सोने ठेऊ शकते याबाबत नियम केले आहेत.

एक विवाहित महिला जास्तीतजास्त 500 ग्रॅम सोने आपल्याजवळ ठेऊ शकते. अविवाहित महिला आपल्याजवळ जास्तीत 250 ग्रॅम सोने ठेऊ शकते. तसे पुरूषांना फक्त 100 ग्रॅम सोने आपल्याजवळ ठेवण्याची परवानगी आहे. 

असं असलं तरी, एखादी व्यक्ती आपल्याकडे येणाऱ्या सोन्याचा वॅलिड सोर्स आणि प्रुफ देत असेल तर त्या सोन्यावर कोणतीही मर्यादा नाही. परंतु विना इनकम सोर्सचे घरात मर्यादेपेक्षा अधिक सोने ठेवण्यास मनाई आहे.

मर्यादेपेक्षा अधिक सोने असेल तर काय ?

कायद्यानुसार ज्वेलरीच्या स्वरूपात असलेल्या सोन्याची कोणतीही मर्यादा नाही. फक्त इनकम प्रुफ देणे गरजेचे आहे. जर सोने वंशपरंपरेने मिळाले असेल तर, त्याचे प्रुफ असणे गरजेचे आहे. अन्यथा इनकम टॅक्स अधिकारी अतिरिक्त सोने जप्तीची कारवाई करू शकतात.

गिफ्टमध्ये मिळालेले सोने टॅक्सेबल नाही.
जर कोणाला गिफ्टमध्ये 50 हजारापैक्षा कमी सोन्याचे दागिने मिळाले असतील तर ते टॅक्सेबल नसतात.