डीजीसीने लावली इटरनॅशनल फ्लाईटवर ३१ मार्चपर्यंत बंदी

डीजीसीएच्या नवीन सुचना 

Updated: Feb 27, 2021, 11:46 AM IST
डीजीसीने लावली इटरनॅशनल फ्लाईटवर ३१ मार्चपर्यंत बंदी title=

मुंबई : देशामध्ये वाढती कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन डीजीसीएने आंतरराष्ट्रीय उड्डाणावर बंदी घातली आहे. नव्या नियमांवलीनुसार आता हे निर्बंध ३१ मार्चपर्यंत राहतील. तसेच कार्गो फ्लाईटस आणि डीजीसीएने मंजुरी दिलेल्या विमानाला कोणतेही निर्बंध लागू होणार नाही.

अध्यापही कोरोना पूर्णपणे  नष्ट झालेला नाही. देशात-परदेशात काही भागात लसीकरण चालू आहे तरीसुद्धा कोरोनाच्या संख्येमध्ये जास्त वाढ झाली आहे. या कारणामुळे डीजीसीएने आंतरराष्ट्रीय उड्डाणावर ३१ मार्चपर्यंत बंदी वाढवण्यात आली आहे.  पहिली ही बंदी २८ फेब्रुवारीपर्यंत होती ती आता पुन्हा वाढवण्यात आली आहे.

डीजीसीएच्या नवीन सुचना 

 डीजीसीएने  शुक्रवारी संध्याकाळी उशिरा नवीन सूचना जारी केल्या आहेत. डीजीसीएने दिलेल्या सूचनांमध्ये असे म्हटले आहे की 'सक्षम प्राधिकरणाने २६ जून, २०२० च्या परिपत्रकाची वैधता वाढविली आहे. त्याअंतर्गत, भारत ते भारतादरम्यान  नियोजित आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवा ३१ मार्च २०२१ पर्यंत २३.५९ मिनिटांसाठी बंद ठेवण्यात येतील.' तसेच डीजीसीएने हे देखील स्पष्ट केले आहे की, निवडलेल्या मार्गांवर आंतरराष्ट्रीय वेळापत्रकात विशिष्ट परिस्थितीत परवानगी दिली जाऊ शकते. त्याशिवाय कार्गो उड्डाणे आणि डीजीसीएने ज्या विमानांना मंजुरी दिली आहे त्यांना या नवीन सूचना लागू होणार नाहीत.

इंटरनॅशनल फ्लाइट जून २०२० पासून बंद

कोरोनाच्या कहरामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांना भारत सरकारने २  जून २०२० पासून बंदी घातली होती, त्यानंतर नव्या मार्गदर्शक सूचनांद्वारे वेळोवेळी ही बंदी वाढविण्यात येत आहे. देशांतर्गत उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत, परंतु त्या पूर्वीच्या तुलनेतही कमी प्रमाणात  आहे.  कोरोना संसर्ग पुन्हा पसरणार नाही याची दक्षतासुध्दा घेतली जात आहे. ज्यामुळे देशात लॉकडाऊन सारखी परिस्थिती उद्भवू शकते. 

कोरोना संसर्ग पुन्हा परतला

कोरोना विषाणूचा कहर पुन्हा देशा-परदेशात परतला आहे. ब्रिटनमध्ये पहिल्यांदा ओळखल्या गेलेल्या व्हायरसच्या नवीन ट्रेंडची २०० पेक्षा जास्त प्रकरणे नोंदवली गेली आहेत. दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमधील काहीशी समान परिस्थिती आहेत. भारताबद्दल बोलताना कोरोनाच्या यू-टर्नचा प्रभाव महाराष्ट्रात सर्वाधिक दिसून येतो, त्यामुळे राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून अमरावतीसह अनेक शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन घेण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब आणि केरळमध्येही कोरोनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एकंदरीत, कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. लसीकरणाबरोबरच सामाजिक अंतर आणि मास्क घालणे फार महत्वाचे आहे.