जेट विमान कर्मचारी महाराष्ट्र दिनी नोकरीसाठी थेट रस्त्यावर

 जेट एअरवेज या खासगी विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आपली नोकरी टिकवण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले आहे.  

Updated: May 1, 2019, 10:06 PM IST
जेट विमान कर्मचारी महाराष्ट्र दिनी नोकरीसाठी थेट रस्त्यावर title=

मुंबई : महाराष्ट्र दिनालाच जेट एअरवेज या खासगी विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आपली नोकरी टिकवण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले आहे. जेटच्या कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ ते सहार पोलीस ठाणे पर्यंत मोर्चा काढला. या वेळी त्यांनी पोलिसांकडे आपल्या मागण्याचं निवेदन दिले.

जेटचे विद्यमान मालकांचे पासपोर्ट जप्त करावेत, त्यांना भारताबाहेर जाऊ देता कामा नये. तसेच या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी कर्मचारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी केली. आतापर्यंत दोघा कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. हे दुर्वैव आहे. किंगफिशर आणि खंबाटा विमान कंपन्यांप्रमाणे जेट कर्मचाऱ्यांची गत होऊ नये, म्हणून सरकारने तातडीने पाऊले उचलण्याची गरज व्यक्त होते.