Jitendra Awhad Molestation Case : अंजली दमानियाही विनयभंग प्रकरणात जिंतेद्र आव्हाड यांच्या पाठीशी

Jitendra Awhad Molestation Case :  जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात न्यायालयीन लढा देणाऱ्या अंजली दमानिया यांनी (Anjali Damaniya) विनयभंग प्रकरणात आव्हाडांची बाजू घेतलीय.  

Updated: Nov 14, 2022, 05:44 PM IST
Jitendra Awhad Molestation Case : अंजली दमानियाही विनयभंग प्रकरणात जिंतेद्र आव्हाड यांच्या पाठीशी  title=

Jitendra Awhad Molestation Case : राष्ट्रवादीचे जिंतेद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोपानंतर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. माझ्यावर झालेला विनयभंगाचा आरोप हा राजकीय सूडबुद्धीतून करण्यात आल्याचंही आव्हाड यांनी स्पष्ट केलंय. आव्हाडांवर झालेल्या विनयभंगाच्या आरोपानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटल्यात. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विनयभंग प्रकरणात आव्हाड यांची बाजू घेतली आहे. (jitendra awhad case anti corruption activist anjali damaniya reaction on ncp jitendra awhad molestation case marathi news)  

दमानिया काय म्हणाल्या? 

"विनयभंगाचा आरोप म्हणजे नीच आणि गटार दर्जाचं राजकारण आहे", अशी संतप्त प्रतिक्रिया दमानिया यांनी  दिली.  "मी आव्हाडांविरुद्ध  खूप लढले. पण तो व्हीडिओ पाहिल्यानंतर त्यांच्यावर होत असलेला आरोप चुकीचा आहे", असंही दमानिया यांनी नमूद केलं.  

नक्की प्रकरण काय? 

रविवारी 13 नोव्हेंबरला कळवा खाडी पुलाचं उद्घाटन करण्यात आलं. हा पूल ठाणे आणि कळव्याला जोडण्याचं काम करतो. या पुलाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जिंतेद्र आव्हाड उपस्थित होते. उद्घाटनस्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. या दरम्यान आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप या महिलेने केलाय.

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक

दरम्यान आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. कार्यकर्त्यांनी मुंब्रा पोलीस स्टेशनबाहेर रास्ता रोको करत आंदोलन केलं.  या रास्ता रोको आंदोलनात आव्हाड यांच्या पत्नी ऋता सामंत-आव्हाड यांही सहभागी झाल्या होत्या. मुंब्रा पोलिसांकडे तक्रारदार महिलेविरोधात तक्रार दाखल केली. तर मुंब्रा बायपासवरही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळून निषेध व्यक्त केला.