कमला मिल आग दुर्घटनेप्रकरणी युगी टुलीला अटक

कमला मिल आग दुर्घटनेप्रकरणी युगी टुलीला अटक करण्यात आली आहे.

Updated: Jan 16, 2018, 09:58 AM IST
कमला मिल आग दुर्घटनेप्रकरणी युगी टुलीला अटक title=

मुंबई : कमला मिल आग दुर्घटनेप्रकरणी युगी टुलीला अटक करण्यात आली आहे. कमला मिल आग दुर्घटनेप्रकरणी युग टुली मुंबई पोलिसांना शरण आलाय.

मोजो ब्रिस्टो रेस्टॉरंटचा सहमालक

सकाळी सव्वा सहा वाजता युग टुली एन. एम. जोशी पोलीस स्टेशनमध्ये युग टुली आला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आलीय. युग टुली हा मोजो ब्रिस्टो रेस्टॉरंटचा सहमालक आहे. मुंबई पोलिसांनी त्याला रात्री अटक केलीय. आगीच्या दुर्घटनेनंतर जवळपास १५ दिवसांनी युगला अटक करण्यात आलीय.    

तीन वेळा चकमा

युग टुली हा मोजो ब्रिस्टो रेस्टॉरंटचा सहमालक आहे...आगीच्या दुर्घटनेनंतर जवळपास 15 दिवसांनी युगला अटक करण्यात आलीय. गेल्या पंधरा दिवसांत युगनं पोलिसांना जवळपास तीन वेळा चकमा दिला. कमला मिल दुर्घटनेनंतर युग त्याच्या बायकोबरोबर जीपमधून हैदराबादला पळून गेला होता. त्याचा पाठलाग करत पोलीस हैदराबादला पोहोचले. पण तिथून तो निसटला. तिथून तो अमृतसरला पळून गेला.  

पहिल्या आरोपीला जामीन

कमला मिल कंपाऊंड आग प्रकरणी अटक झालेल्या विशाल कारियाला जामीन मंजूर झालाय आहे. फरार पब मालकांना आश्रय दिल्याचा आरोप कारियावर होता. पब मालकांच्या गाड्या कारियाच्या घराबाहेर सापडल्या होत्या. 9 जानेवारीला पोलिसांनी कारियाला अटक केली होती. 

कारियाची पार्श्वभूमी वादग्रस्त

कारियाची पार्श्वभूमी वादग्रस्त आहे. क्रिकेट बुकींशी संबंध असल्याचाही कारियावर आरोप होता. क्रिकेट बुकींशी असलेल्या संबंधांवरूवनही त्याची याआधी चौकशी झाली होती. प्रत्यक्ष आगीच्या दुर्घटनेत कारियाचा सहभाग नव्हता. कारिया कोणत्याही पबचा मालक किंवा भागीदारही नव्हता, त्या आधारावर त्याला जामीनावर सोडण्यात आलं.