Loksabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना खणखणीत टोला, म्हणाले 'टरबुजाची किंमत...'

Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानास अवघे काही दिवस उरले असतानाच प्रचाराला वेग.   

Loksabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना खणखणीत टोला, म्हणाले 'टरबुजाची किंमत...'

Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याच्या धर्तीवर सध्या मुंबईसह उर्वरित मतदारसंघांमध्ये प्रचाराला वेग आला असून, बड्या नेत्यांनीही प्रचाराच्या या अखेरच्या टप्प्यात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. राज्यात शेवटच्या टप्प्यातील प्रचार शिगेला. मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात आज उद्धव ठाकरेंची सभा, तर नाशिक आणि डोंबिवलीत शिंदेंचं शक्तिप्रदर्शन. 

दरम्यान, नुकत्याच झालेल्या पंतप्रधानांच्या रोड शोमध्ये त्यांनी विरोधकांवर केलेली टीका पाहता आता या टप्प्यासाठीचं राजकारण पुन्हा तापताना दिसत आहे. यामध्ये कोणकोणत्या नेत्यांची भूमिका लक्ष वेधणारी आणि विरोधी पक्षांना ललकारणारी आहे याच्या सर्व अपडेट्स एका क्लिकवर... 

16 May 2024, 20:07 वाजता

मोदीजी येत्या चार तारखेला तुम्ही फक्त नरेंद्र मोदी असणार आहात पंतप्रधान नसणार आहात. चार वर्षांपूर्वी ज्याप्रमाणे तुम्ही डी मॉनिटायझेशन केलेलं त्याप्रमाणे चार तारखेनंतर तुम्ही डीमोदीटायजेशन करणार आहात, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. मोदी तुम्ही जर शब्दाचे पक्के असाल तर 75 वर्षानंतर तुम्ही राजकारण सोडाल. कारण तुम्ही दोन वर्षानंतर 75 वर्षांचे होणार आहात आणि मग तेव्हा भाजपाचे काय होणार? आता तुमचा फक्त एकच चेहरा आहे तो देखील चालत नाही तुमच्या नंतर भाजपला चेहराच नाही. भाजपच्या  कठीण काळात सगळ्या पक्षांनी तुमच्याकडे पाठ फिरवलेली असताना शिवसेना तुमच्याबरोबर होती, अशी आठवण देखील उद्धव ठाकरेंनी करून दिलीये.

अक्षय कुमारला मोदींना आंबा कसा खायचा हे विचारण्यापेक्षा टरबूज कसा खायचा हे देखील विचारा कारण निवडणुकीनंतर टरबुजाची किंमत कमी होणार आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना टोला लगावला. मी चपरासी झालो तरी चालेल मी पुन्हा येईन अशा पद्धतीचा वागणं देवेंद्र फडणवीस यांचं आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आमची सुरत लुटली होती त्याच महाराष्ट्राच्या दोन जणांना घेऊन तुमचा तुम्ही अख्खा महाराष्ट्र लुटतात बाळासाहेबांचे विचार नव्हे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका केली.

16 May 2024, 19:25 वाजता

सुनील तटकरे छगन भुजबळांच्या भेटीला

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मंत्री छगन भुजबळांच्या भेटीला गेले आहेत. छगन भुजबळ यांची सदिच्छा भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर दिलीप खैरे यांनी सुनील तटकरे यांचं स्वागत केलं. 

16 May 2024, 18:37 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : डोंबिवलीत उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणी जोरदार पाऊस, भर पावसात सभा घेणार 

16 May 2024, 18:31 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरे यांच्या ठाण्यातील सभेवर पावसाचं सावट; ठाण्यात ढगाळ वातावरण, पाऊस येण्याची शक्यता

16 May 2024, 17:28 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : ठाकरेंसमोर शिंदे गटाची घोषणाबाजी

उद्धव ठाकरे यांचा ताफा जात असताना शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी केल्याचा प्रकार समोर आला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी  मुख्यमंत्री यांची उपस्थिती आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या   शिंदे गटाच्या शिवसैनिकांची घोषणाबाजी

16 May 2024, 17:02 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीसमोर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांनी मशालीचे चिन्ह दाखवून केली घोषणाबाजी

16 May 2024, 15:51 वाजता

मग तुम्ही बाळासाहेबांशी असे का वागलात? भुजबळांचा राज ठाकरेंना सवाल

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. म्ही तर रक्ताचे होतात, घरातले होतात मग तुम्ही का बाळासाहेबांशी असे वागलात ? बाळासाहेब तर तुमच्याशिवाय जेवत नव्हते, अशा शब्दांत त्यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

16 May 2024, 14:51 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates: 4 जूननंतर ठाकरे आणि शरद पवार गटातले अनेक नेते इतर पक्षांमध्ये जाणार; भाजप नेते मोहित कंबोज यांचा दावा

16 May 2024, 14:14 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरे यांची डोंबिवलीत सायंकाळी सभा

डोंबिवलीत आज उद्धव ठाकरे यांची सभा होत असून भागशाळा मैदानात सायंकाळी ही सभा होणार आहे

16 May 2024, 14:13 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाशिकमध्ये रॅली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅली समोर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांनी मशालीचे चिन्ह दाखवून केली घोषणाबाजी.