Local train update | महामुंबईत रविवारी मेगाब्लॉक; हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी महत्वाची अपडेट

 रेल्वे रुळ आणि इतर तांत्रिक बाबींच्या देखभालीसाठी रविवारी (20 मे) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे

Updated: Jun 19, 2021, 08:41 AM IST
Local train update | महामुंबईत रविवारी मेगाब्लॉक; हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी महत्वाची अपडेट title=

मुंबई : रेल्वे रुळ आणि इतर तांत्रिक बाबींच्या देखभालीसाठी रविवारी (20 मे) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यादरम्यान विविध मार्गावरील लोकल सेवा बंद असणार आहे. घराच्या बाहेर पडण्याआधी मेगाब्लॉक नक्की कोणत्या मार्गावर असणार आहे. त्याबाबत जाणून घेणे महत्वाचे आहे.

टान्स हार्बर 

ठाणे - वाशी / नेरुळ अप व डाउन ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा सकाळी 11.10 ते संध्याकाळी 4.10 वाजेपर्यंत  बंद राहिल.

हार्बर

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी / वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते संध्याकाळी 4.40 दरम्यान ब्लॉक
चुनाभट्टी /वांद्रे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते संध्याकाळी 4.10 दरम्यान  ब्लॉक

डाउन हार्बर मार्गावर वाशी / बेलापूर /पनवेलकरीता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई / वडाळा रोड येथून सकाळी 11.34 ते संध्याकाळी 4.47 वाजेपर्यंत  सुटणा-या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.56 ते संध्याकाळी 4.43 दरम्यान वांद्रे/ गोरेगाव दरम्यान डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.  

ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.  

ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेमार्गे जाण्याची परवानगी आहे. 

मुख्य मार्गावर कोणताही मेगा ब्लॉक राहणार नाही