'मतदान करा, खाद्यपदार्थांवर ५० टक्के सूट मिळवा'

बोटावरच्या शाईमुळे तुम्हाला स्वस्तात मस्त खाद्यपदार्थ खायला मिळू शकेल असे आवाहन व्यापाऱ्याने केले आहे.

Updated: Apr 5, 2019, 02:54 PM IST
'मतदान करा, खाद्यपदार्थांवर ५० टक्के सूट मिळवा' title=

अमोल पेडणेकर, झी २४ तास मुंबई : निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी आयोगाकडून जनजागृती केली जाते. पण मुंबईतल्या एका व्यापाऱ्यांनं मतदानाचं प्रमाण वाढावं यासाठी स्वयंप्रेरणेनं एक मोहीम हाती घेतली आहे. मुंबईकरांनो यंदा मतदान कराल तर बोटावरची शाई जपून ठेवा. कारण बोटावरच्या शाईमुळे तुम्हाला स्वस्तात मस्त खाद्यपदार्थ खायला मिळू शकेल असे आवाहन व्यापाऱ्याने केले आहे.

Image result for voting zee news

भांडुपच्या एका व्यापाऱ्यांनं मतदारांसाठी एक मोहीम सुरू केली आहे. मतदान करा आणि कोणत्याही खाद्यपदार्थावर पन्नास टक्के सुट मिळवा अशी ऑफर या कीर्ती शहा या दुकानदाराने दिली आहे. २९ आणि ३० एप्रिलपर्यंत ही ऑफर लागू असणार आहे. य़ासाठी अट फक्त एकच आहे. ज्याला ऑफरचा लाभ घ्यायचाय़ त्यानं हाताच्या बोटावर मतदान केल्याची शाई दाखवायचीय.

Image result for voting zee news

प्रत्येकानं मतदान केलं तर लोकांच्या पसंतीचा उमेदवार लोकप्रतिनिधी म्हणून निवडला जाईल. लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी एका दुकानदारानं स्वयंस्फुर्तीनं सुरू केलेली ही मोहीम कौतुकास्पद आहे. कीर्ती शहांची ही मोहीम म्हणजे लोकशाही भारतीयांमध्ये किती खोलवर रुजत चाललीय याचं प्रतिक आहे.