Lok Sabha 2024 : महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम, 9 तारखेला दिल्ली पुन्हा खलबतं

Lok Sabha 2024 : मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन जोरदार रस्सीखेच सुरुच आहे. मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्त्वात झालेली बैठकीही फिसकटली आहे. 

नेहा चौधरी | Updated: Mar 7, 2024, 07:54 AM IST
Lok Sabha 2024 : महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम, 9 तारखेला दिल्ली पुन्हा खलबतं title=
loksabha 2024 The rift of seat distribution in the Grand Alliance continues amit shah Delhi will be disturbed again on the 9th March bjp shivsena ncp meeting

Lok Sabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतल्या सर्व पक्षांची जागेसाठी जोरदार खलबत सुरु आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली बैठक निष्फळ ठरली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने 29 ते 30 जागा तर शिंदे गटाला 13 ते 14 आणि राष्ट्रवादीला पाच जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. पण दोन्ही मित्रपक्षांनी जास्त जागांची मागणी केली असल्याने जागा वाटपाचा तिढा अजून कायम आहे. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय आता दिल्लीत शनिवारी 9 मार्चला होणार असल्याच म्हटलं जातं. (loksabha 2024  The rift of seat distribution in the Grand Alliance continues amit shah Delhi will be disturbed again on the 9th March bjp shivsena ncp meeting)

अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांशी जागावाटपासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मित्रपक्षाशी चर्चा केली. या बैठकीत शिवसेनेने 18 ते 20 आणि राष्ट्रवादीने 10 ते 12 जागांची मागणी केल्यामुळे जागावाटपाचा तिढा बिकट झाला आहे. जागावाटपावरुन दिल्ली असो मुंबईत सर्व पक्षांचे बैठकीचं सत्र सुरु आहे. महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत दिल्लीत भाजप कोअर कमिटीची बैठक बुधवारी रात्री उशिरा पार पडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाली. ही बैठक पाऊण तास झाली तरी त्यातून काही निष्पण निघालं नाही. 

त्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कोअर कमिटीसोबत दिल्लीत चर्चा केली. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या घरी तब्बल पाऊण तास सुरू असलेल्या या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते. 

मविआतील जागावाटपाचा घोळ कायम!

दरम्यान महायुतीसोबतच महाविकास आघाडीतील जागावाटपाचा घोळ कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि प्रकाश आंबेडकर यांची बैठक झाली. पुढील बैठकीत चित्र स्पष्ट होईल असं आंबेडकर यांनी सांगितलं. आता 9 मार्चला महायुती आणि मविआ जागाचा वाटपचा कुठला फॉर्म्युला राबवणार आहेत हे स्पष्ट होईल.