Maharashtra Budget 2020 : राज्याच्या अर्थसंकल्पात उद्योग विभाग, पाहा अजितदादांनी काय दिले?

 महाविकास आघाडी सरकारचा २०२०चा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. त्यांनी सर्वच विभागाला खूश करण्याचा प्रयत्न केला आहे.  

Updated: Mar 6, 2020, 01:33 PM IST
Maharashtra Budget 2020 : राज्याच्या अर्थसंकल्पात उद्योग विभाग, पाहा अजितदादांनी काय दिले? title=

मुंबई : महाविकास आघाडी सरकारचा २०२०चा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. त्यांनी सर्वच विभागाला खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. पायाभूत सुविधांपासून रोजगार निर्मिती, तरुणांना रोजगार मिळण्यासाठी कायदा,  रस्ते विकासाबरोबरच पर्यटन व्यवसाय वाढीला लागण्यासाठी विशेष भर देण्यात आला आहे.  पाच वर्षात दहा लाख रोजगार निर्माण होईल, अशा आशा त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांसह एसटीला नवी गती मिळण्यासाठी प्राधान्य. शिक्षण, आरोग्य विषय सुविधांवर मोठा भर देण्यात आला आहे. तसेच पर्यटन आणि मासेमारी व्यवसाय, फळ प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे.

Maharashtra Budget 2020 : ८० टक्के स्थानिकांना नोकऱ्या, कायदा करणार

- नावीन्यपूर्ण ऊर्जापार्क तयार करण्यात येणार. तर पुण्यात ऑलिम्पिक भवन बांधणे प्रस्तावित आहे.

- दिल्ली - मुंबई इंडस्ट्रिअल कोरिडोरच्या धर्तीवर सातारा जिल्ह्यात हा प्रकल्प सुरू करणार. त्यासाठी ४ हजार कोटी यासाठी प्रस्तावित.

- महाराष्ट्र सीमा भागातील मराठी बांधवांसाठी शांळासाठी १० कोटी सहाय्य देणार. मराठी वर्तमानासाठी जाहिराती देण्यात येतील.

- गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी तरुणांच्या सहकार्याने योजना सुरू करणार

- आर्थिक मंदीच्या सावटाखाली तरुण. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रत्येकाच्या हाताला काम देण्यासाठी नवीन महाराष्ट्र शिकाऊ योजना सुरू केली जाणार आहे. याद्वारे पाच वर्षात दहा लाख रोजगार निर्माण होईल.

- उद्योगांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध व्हावे म्हणून ई कॉमर्स, टेक्सटाइल, फिनटेक क्षेत्राचे तरुणांना प्रशिक्षण दिले जाणार. सुशिक्षित बेरोजगारांसाठी ही योजना लागु करण्यात येईल. नवीन उद्योग क्षेत्रात ठराविक कालावधीसाठी प्रशिक्षण दिले जाईल. दरमहिना रक्कम खासगी आस्थापनांद्वारे प्रशिक्षणासाठी दिली जाईल. 

- राज्य शासकीय निमशासकीय अस्थापनांसाठी निधी दिला जाईल. या योजनेसाठी सहा हजार कोटी रुपये प्रस्तावित आहे.

- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. या योजनेसाठी १५ ते ३५ टक्के अनुदान देण्यात येत आहे. १ लाख उद्योग घटक निर्माण होणार. १३० कोटी रुपये प्रस्तावित आहे. २०-२१ साठी ५०१ कोटी प्रस्तावित.

- शिवभोजन योजना - या योजनेची व्याप्ती वाढवून १ लाख थाळी करण्यात येणार आहे.

- मराठी भाषा भवन मुंबईत वडाळा येथे बांधण्याचे प्रस्तावित आहे.

- नवी मुंबईत वाशी येथे महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार आहे.