राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी, ठरलं! अजित पवार गटाला 'ही' खाती मिळणार?

Shinde-Fadanvis-Pawar Government : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यांच्याबरोबर आलेल्या आमदारांपैकी 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. पण अद्याप या मंत्र्यांना कोणतीही खाती मिळालेली नाहीत. आता लवकरच खातेवाटप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

राजीव कासले | Updated: Jul 11, 2023, 02:14 PM IST
राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी, ठरलं! अजित पवार गटाला 'ही' खाती मिळणार?  title=

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणातली सध्याची सर्वात मोठी बातमी. अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह आठ आमदरांनी (MLA) 2 जुलैला मंत्रीपदाची शपथ घेतली. पण आठवडा उलटल्यनंतरही खातेवाटप झालेलं नाही. आता लवकरच खातेवाटप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार गटाला कोणती खाती मिळणार याची चर्चा सुरू झालीय. सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार यांच्या गटाला अर्थ, ग्रामविकास, महिला आणि बालविकास, अल्पसंख्याक, कामगार, अन्न नागरीपुरवठा ही महत्त्वाची खाती मिळण्याची शक्यता आहे. मात्र खातेवाटपासाठी मंत्रिमंडळ विस्तारानंतरच मुहूर्त लागेल अशी शक्यता आहे.

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं संभाव्य खातेवाटप समोर आलं आहे. यात अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे अर्थ व वित्त खातं असण्याची शक्यता आहे. तर 
दिलीप वळसे पाटील :- सहकार मंत्री
धनंजय मुंडे :- सांस्कृतिक विभाग
अदिती तटकरे :- महिला व बालविकास मंत्री
हसन मुश्रीफ :- वस्त्र उद्योग
छगन भुजबळ :- अन्न व पुरवठा
संजय बनसोडे :- क्रीडा
अनिल पाटील :- पशु व वैद्यकीय
धर्मराज बाबा आत्राम :- आदिवासी

9-9-9 चा फॉर्म्युला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटातील 9 आमदारांकडे मंत्रीपदं आहेत. तर भाजपाचेही 9 नेते शिंदे सरकारमध्ये मंत्री आहेत. त्याचप्रमाणे आता अजित पवारांबरोबर आलेल्या 40 आमदारांपैकी 9 जणांना मंत्रीपदं देण्यात आली आहेत. या नव्या मंत्र्यांची खाती जाहीर करण्यात आलेली नाहीत. मात्र आता शिंदे सरकारमध्ये एकूण 27 मंत्री झाले असून 9-9-9 चा फॉर्म्युला वापरण्यात आला आहे. 

म्हणून खातेवाटप लांबणीवर?
राष्ट्रवादीतील अजित पवार गट शिंदे सरकारमध्ये  (Shinde Government) सामील झाल्यामुळे शिंदे गटाची (Shinde Group) डोकेदुखी वाढल्याचं बोललं जात होतं. शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार नाराज असल्यामुळे खातेवाटप लांबवणीवर पडल्याची शक्यता वर्तवली जातेय. पहिले आमचा देखील मंत्रिमंडळात समाविष्ट करून घ्या त्यानंतर खाते वाटप करा, अशी आग्रही मागणी शिंदे गटाने केली आहे. त्यामुळे तिसरा शपथविधी झाल्याशिवाय खाते वाटप केलं जाणार नाही अशी सूत्रांची माहिती आहे. 
 
भरत गोगावलेंना संधी?
राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्याने शिंदे गटाच्या आमदारांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळणार का याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला संधी मिळेल असा दावा शिंदे गटाच्या भरत गोगावलेंनी केलाय. तसंच रायगडचा पालकमंत्रीही आपणच असणार असं गोगावलेंनी ठणकावून सांगितलंय..