Maharashtra Political News : दिल्ली दरबारी राज्यातील खलबतं; मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस Delhi दौऱ्यावर

 Eknath Shinde and Fadnavis Visit Delhi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. (Political News)  राज्यातल्या प्रस्तावित मंत्रिमंडळ विस्तार आणि राज्यपाल यांची राजीनाम्याची इच्छा यावर ते अमित शाह यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. 

Updated: Jan 24, 2023, 10:30 AM IST
Maharashtra Political News : दिल्ली दरबारी राज्यातील खलबतं; मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस Delhi दौऱ्यावर  title=
Maharashtra CM Eknath Shinde । Deputy CM Fadnavis Visit Delhi Today

CM Eknath Shinde and Fadnavis Visit Delhi Today : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. (Political News) आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यावर शिंदे फडणवीस दिल्लीकडे रवाना होतील. (Maharashtra Political News) दिल्लीत ते केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. राज्यातल्या प्रस्तावित मंत्रिमंडळ विस्तार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजीनाम्याची इच्छा यावर ते अमित शाह यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. राज्यातील साखर उद्योगा संदर्भातही बैठक होणार आहे. या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, धनंजय महाडिक, रणजितसिंह मोहीते पाटील उपस्थित राहणारेत. (Latest Political News in Marathi

शिंदे आणि देवेंद्र फडणवीस वारंवार दिल्ली दौऱ्यावर

राज्यातील राजकारण सध्या ढवळून निघाले आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक हालचाली पाहायला मिळाल्या. राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस वारंवार दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यावरुन विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. तसेच शिंदे गट आणि भाजपमधील काही आमदार नाराज आहेत. शिंदे गटातील आमदारांनी भाजपबाबत नाराजीही व्यक्त केली होती. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमधील नाराजी चव्हाट्यावर आली.

 राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा ?

दरम्यान,  शिंदे सरकारमधील 20 मंत्र्यांनी जुलै महिन्यात मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तार रखडला आहे. लवकरच दुसरा विस्तार होईल असे आश्वासन देत नाराजींना दिलासा देण्याचा प्रयत्न दिसून येत होता. मात्र, काही आमदारांची तीव्र नाराजी वाढल्याचे दिसून येत आहे.  त्यामुळे आता मोदी मुंबई दौरा आणि आज मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचा दिल्ली दौऱ्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

आता, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यात नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा करतील याची अनेकांना उत्सुकता आहे. तसेच राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होईल का, याचीही उत्सुकता आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच राज्यपाल पदापासून मुक्त करण्याची विनंती भगतसिंह कोश्यारी यांनी केली आहे. मात्र, त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन भाजप आणि राज्य सरकार अडचणीत आले आहे. भाजपकडून राज्यपालांच्या वक्तव्यावरुन स्पष्टीकरण देता आलेले नाही. त्यामुळे  भाजपचीही अडचण झाली होती. त्यामुळे कोश्यारी यांना हटविण्याची मागणी झाली होती. विरोधकांनीही राज्यपाल यांच्याविधानावरुन सत्ताधारी शिंदे सरकारला अडचणीत आणले होते. त्यामुळे त्यांच्या जागी कोण येणार याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

पवार यांनी बोलावली प्रमुख नेत्यांची बैठक

दरम्यान, दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. मुंबईत पक्षाची ही महत्त्वाची बैठक होत आहे. कालच शिवसेना आणि वंचितची युती झाली आहे. त्यावर बैठकीत चर्चा होणार आहे. विधानपरिषदेच्या शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघ निवडणुकीबाबतही मंथन होईल. शरद पवार नेत्यांच्या कामाचा आढावा देखील घेणारेत. बैठकीला शरद पवारांसह अजित पवार, जयंत पाटील, वळसे पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहतील.