Maharashtra Politics : ...तर सोडणार नाही; आशिष शेलार यांचा राज ठाकरे यांना इशारा

आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्यावर सडकून टिका केली आहे. सर्वोच्च नेत्यावर टिका कराल तर सोडणार नाही असा इशाराच त्यांनी दिला आहे. 

वनिता कांबळे | Updated: May 21, 2023, 06:36 PM IST
Maharashtra Politics : ...तर सोडणार नाही; आशिष शेलार यांचा राज ठाकरे यांना इशारा title=

Raj Thackeray Vs Ashish Shelar : रिझर्व्ह बँकेने दोन हजारांची नोटबंदीचा निर्णय जाहीर केला. यानंतर राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरु झाले.  मोदी सरकारच्या नोटबंदीच्या  या निर्णयावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) जोरदार टीकास्त्र डागलं. तज्ज्ञांना विचारुन असे निर्णय घेतले पाहिजे होते असा सल्ला राज ठाकरेंनी दिला. नोटबंदीवरून राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला आशिष शेलारांनी (Ashish Shelar ) प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी शेलार यांनी राज ठाकरे यांना मोदीवर टीका केल्यास सोडणार नाही असा इशारा दिला आहे.  

आमच्या सर्वोच्च नेत्यावर टीका कराल तर सोडणार नाही

नोटबंदीवरून राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला आशिष शेलारांनी प्रत्युत्तर दिले आहे. नोटबंदीचा निर्णय धरसोडपणाचा असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्यावरून आता आशिष शेलारांनी राज ठाकरेंना इशारा दिला आहे. तुम्ही उत्तम नेते आहात, मात्र, आमच्या सर्वोच्च नेत्यावर टीका कराल तर सोडणार नाही असं शेलार म्हणाले आहेत.

राज ठाकरे नमेकं काय म्हणाले होते?

रिझर्व्ह बँकेनं 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. त्यावरुन आता राजकीय वारप्रहार सुरु झाले आहेत. नोटबंदीचा निर्णय धरसोडपणाचा असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे. तर, मोदींनी अर्थव्यवस्थेचा खेळखंडोबा केला असा घणाघात ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊतांनी केला आहे. काळा पैसा असलेल्यांनाच चिंता करावी लागेल असं प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली होती.  

2 हजाराच्या नोटबंदीवरून विरोधक आणि सत्ताधा-यांमध्ये जुंपली

2 हजाराच्या नोटबंदीवरून विरोधक आणि सत्ताधा-यांमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. हा निर्णय म्हणजे अर्थव्यवस्थेशी खेळखंडोबा असल्याची टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी केली. निवडणुकांच्या अनुषंघाने हा निर्णय घेतला गेला असावा असंही त्यांनी म्हंटलंय. तर विरोधकांकडे जास्तीच्या नोटा असतील म्हणून तर टीका होत नाही ना असा सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

2 हजार रुपयांची नोट चलनातून बाद होणाराय... भारतीय रिझर्व्ह बँकेनं तसा निर्णय घेतला आहे. 19 मे 2023 रोजी हे जाहीर करण्यात आले.  30 सप्टेंबरपर्यंतच या गुलाबी नोटा चलनात असणार आहेत. 23 मे ते 30 सप्टेंबर या कालावधीत बँकांमध्ये २ हजार रुपयांच्या नोटा बदली करता येतील. एकावेळी जास्तीत जास्त 20 हजार रुपयांच्या नोटा बदली करता येणार आहेत.