तपोवनमध्ये हस्तमैथुन करणारा अटकेत

सीएसटीवर प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या तपोवनमध्ये तरूणीला पाहून हस्तमैथुन करणाऱ्या  विकृत  व्यक्तीला दोन दिवसांनंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मीडियामध्ये या विषयाची चर्चा झाल्यावर पोलिसांची धावपळ झाली आणि त्यांनी गरज पडली म्हणून चक्रे फिरवून त्या व्यक्तीला अटक केली आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jul 13, 2017, 08:05 PM IST
 तपोवनमध्ये हस्तमैथुन करणारा अटकेत  title=

मुंबई : सीएसटीवर प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या तपोवनमध्ये तरूणीला पाहून हस्तमैथुन करणाऱ्या  विकृत  व्यक्तीला दोन दिवसांनंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मीडियामध्ये या विषयाची चर्चा झाल्यावर पोलिसांची धावपळ झाली आणि त्यांनी गरज पडली म्हणून चक्रे फिरवून त्या व्यक्तीला अटक केली आहे. 

ही घटना २९ जून रोजी सकाळी ५.३० वाजता घडली आहे. नाशिकला जाण्यासाठी या आरक्षित डबा डी-०१ जवळ उभी होती. त्यावेळी तपोवनमध्ये दिवे बंद असताना एक व्यक्ती त्या तरूणीकडे पाहून हस्तमैथुन करू लागला. त्यानंतर ती दुसरीकडे गेली. तो त्या ठिकाणीही आला. 

जे घडतंय ते खूपच चुकीचं आहे आणि याची माहिती पोलिसांना द्यायला हवी म्हणून ती या प्रकाराची माहिती देण्यासाठी पोलिसांकडे पोहोचली. पण तिला आलेला अनुभव हा यापेक्षाही वाईट होता.  लोहमार्ग पोलिसांकडून तिला अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. माझ्यासोबत जे काही घडले त्याचा पुरावा म्हणून मी व्हिडिओ पोलिसांना दाखवला पण हे काय नेहमीचंच असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. एक पोलीस तर व्हिडिओ पाहून निघूनही गेले

“आपल्या आग्रहाखातर एक पोलीस तिथे आले, पण त्यांचा चेहराही फार त्रासलेला होता. मी या पोलिसांना काय घडलं ते सांगितलं. पण या तरूणाला पकडून त्याच्यावर कारवाई करणं तर दूरच राहिलं पण तुम्ही दुसरीकडे निघून जा, असा सल्ला या पोलिसाने दिला. त्याचं या ट्रेनमध्ये आरक्षण असेल तेव्हा यावर काहीच करता येऊ शकत नाही असं सांगून पोलीस निघून गेले आणि पोलिसांना पाहताच त्या तरुणानेही पळ काढला, असेही तीने सांगितले. 

घडलेल्या संपूर्ण प्रकराचा व्हिडिओ तिने रेकॉर्ड केलाय. संबंधित तरुणी मूळची पुण्याची आहे. कामानिमित्त मुंबईत आलीय होती आणि तिला नाशिकला पुन्हा कामासाठी जायचे होते.