'भाजपला मराठा समाजाकडून प्रत्युत्तर मिळणार'

आरक्षणाचा मुद्दा भाजप सरकारच्या चांगलाच अंगलट येणार, असं दिसतंय.

Updated: Dec 20, 2017, 11:22 PM IST
'भाजपला मराठा समाजाकडून प्रत्युत्तर मिळणार' title=

मुंबई : आरक्षणाचा मुद्दा भाजप सरकारच्या चांगलाच अंगलट येणार, असं दिसतंय.

गुजरात निवडणुकीत पटेल समाजानं भाजपला जोरदार धक्का दिला... तर आता मुंबईत मराठा समाजाचे भाजपविरोधी मोठ्ठाले पोस्टर्स आणि बॅनर्स ठिकठिकाणी दिसू लागलेत... हे बॅनर्स भाजपसाठी एखाद्या धमकीपेक्षा कमी नाहीत.

'गुजरातमध्ये भाजप सेन्चुरीही पूर्ण करू शकली नाही... हा इशारा आहे, जर महाराष्ट्रात आरक्षण दिलं गेलं नाही तर येत्या निवडणुकीत इथं भाजप ५० चा आकडाही गाठू शकणार नाही, हे लक्षात ठेवा... हेच मराठा समाजाचं प्रत्युत्तर असेल' असा संदेश या बॅनर्सवरून मराठा युवा मोर्चानं दिलाय. 

या बॅनर्समुळे भाजपची झोप उडालीय. महाराष्ट्रात जवळपास ३४ टक्के मराठा समाज आहे. मराठा समाजानं आपल्याला शिक्षण आणि सरकारी नोकरी १६ टक्क्यांचं आरक्षणाची मागणी केलीय.