Measles outbreak in Mumbai : मुंबईत आता गोवरची साथ, लहान मुलांची अशी घ्या काळजी

Measles Outbreak in Mumbai : गोवरची साथ आल्याने लहान मुलांची अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

Updated: Nov 10, 2022, 04:57 PM IST
Measles outbreak in Mumbai : मुंबईत आता गोवरची साथ, लहान मुलांची अशी घ्या काळजी title=

Measles Outbreak in Mumbai​: कोरोना आणि इतर संसर्गाचे आजार पसरत असताना आता मुंबईकरांवर आणखी संकट उभं आहे. कारण गोवंडी भागात गोवर साथीच्या आजाराचा उद्रेक पाहायला मिळत आहे. यामुळे आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 48 तासात 3 मुलांचा गोवरमुळे मृत्यू झालाय. यामुळे आता मुंबई महापालिका (BMC) देखील सतर्क झाली आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार मुंबईत गोवरची आतापर्यंत 29 प्रकरणं समोर आलीत. या आजारात मुलांना ताप आणि डोळ्यातून पाणी येणे ही लक्षणं दिसतात.

लहान मुलांना वयाच्या 9 व्या महिन्यात गोवरची लस दिली जाते. ज्या 29 मुलांना गोवरची लागण झाली आहे. त्यापैकी जवळपास 15 जणांचे लसीकरण झाले आहे.  ज्या दोन मुलांचा मृत्यू झालाय त्यापैकी एका मुलाचं वय 5 वर्ष तर त्याच्याच भावाचं वय 3 वर्ष आहे. तर तिसऱ्या मुलाचं वय 14 महिने आहे.

गोवर हा एक संसर्गजन्य रोग आहे. एकमेकांच्या संपर्कात आल्याने तो पसरतो. या मुलांचा शवविच्छेदन अहवाल येणं अजून बाकी आहे. त्यामुळे या मुलांचा मृत्यू गोवरमुळेच झाला की नाही हे स्पष्ट होणारे.

गोवर काय आहे? What is Measles

गोवर हा एक विषाणूपासून पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. जो लहान मुलांना अधिक होतो. एकदा गोवर होऊन गेल्यास तो पुन्हा होण्याची शक्यता फार कमी असेते. गोवर हा Paramyxovirus या व्हायरसमुळे पसरतो. 10 ते 12 दिवसात गोवरची लक्षणे जाणवू लागतात. खोकल्याने किंवा शिंकल्याने तो पसरु शकतो.
बाळांना जन्मानंतर नवव्या महिन्यात गोवरची लस दिली जाते. त्यानंतर दुसरा डोस दीड ते दोन वर्षात दिली जाते.

गोवरची लक्षणं काय आहेत?

खोकला, ताप, सर्दी होणे,
डोळ्यांची जळजळ होणे, डोळे लाल होणे
घशात दुखणे
तोंडात पांढरे स्पॉट येणे
‎अशक्तपणा
अंग दुखी
चेहऱ्यावर, पोटावर आणि पाठीवर लाल पुरळ उठतात.

कशी घ्यावी काळजी

लहान बालकांना वेळेत सर्व लसी द्याव्यात.
गोवर झालेल्या लोकांच्या संपर्कात जाणे टाळावे
हात स्वच्छ धुणे