रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक

रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीसह सिग्नलमध्ये तांत्रिक दोष दूर करणे रुळांमधील खडी बदलणे या कामांसाठी रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात आलाय.

Updated: May 28, 2017, 07:49 AM IST
रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक title=

मुंबई : रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीसह सिग्नलमध्ये तांत्रिक दोष दूर करणे रुळांमधील खडी बदलणे या कामांसाठी रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावर सकाळी 10:58 ते दुपारी 4:30 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.

यादरम्यान धिम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. हार्बरच्या सीएसटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11:40 ते दुपारी 4:40 पर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात आलाय.

या दरम्यान हार्बर रेल्वेच्या प्रवाशांना मध्य आणि पश्चिम रेल्वेनं प्रवास करण्याची मूभा देण्यात आलीये. तर पश्चिम रेल्वेवर सांताक्रूज ते गोरेगाव स्थानकांदरम्यान सकाळी 10:35 ते दुपारी 3:35 वाजेपर्यंत अप-डाऊन जलद मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात आलाय. परिणामी जलद मार्गावरी वाहतूक धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे.