Railway Megablock : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, 'या' वेळेत धावतील लोकल ट्रेन

Mumbai Local : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रेल्वेकडून आज (26 फेब्रुवारी) मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी घरातून बाहेर पडण्यापूर्वी लोकलचे संपूर्ण वेळापत्रक चेक करा. मेगाब्लॉकच्या काळात मध्य व हार्बर मार्गावरील वाहतू0क विस्कळीत राहील. 

Updated: Feb 26, 2023, 08:15 AM IST
Railway Megablock : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, 'या' वेळेत धावतील लोकल ट्रेन title=
Mumbai Local Train Services To Be Affected on Central and Harbour

Railway Megablock :  मुंबई उपनगरीय रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी असेल. कारण लोकलच्या तिन्ही मार्गावर आज (26 फेब्रुवारी) रेल्वेचा मेगाब्लॉक (railway megablock) घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉक कालावधीत रेल्वेची सेवा बंद राहणार आहेत. तर काही ठिकाणी विशेष रेल्वे सेवा सुरु ठेवण्यात येणार आहे. ( Mumbai Railway Mega block on 26 February 2023 )

मध्य रेल्वे (central railway)

कुठे : माटुंगा ते मुलुंड मार्गावर 
कधी : सकाळी 11 ते 3.55 वाजेपर्यंत  
परिणाम : सीएसएमटीहून स्लो ट्रॅकवरून सुटणाऱ्या गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. त्यानंतर मुलुंड स्थानकावर पुन्हा स्लो ट्रॅकवर वळवण्यात येतील आणि 15 मिनिटे उशिरानं निश्चित स्थानकात पोहोचतील. 

हार्बर रेल्वे (harbour railway)

कुठे :   पनवेल - वाशी अप आणि डाऊन मार्गावर  
कधी : सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत 
परिणाम : पनवेल - बेलापूर येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल - बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येणार आहेत.  

पश्चिम रेल्वे (western railway)

कुठे :  सांताक्रूझ - गोरेगाव अप- डाऊन जलद मार्गावर 
कधी : सकाळी 10 ते 3  वाजेपर्यंत 
परिणाम : बोरिवलीहून सुटणाऱ्या काही लोकल गोरेगाव स्थानकापर्यंत धावतील. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.