मध्य आणि हार्बर मार्गावर ११ ते ४.३० पर्यंत मेगाब्लॉक

मध्य, हार्बर मार्गावर आज सकाळी ११ ते दुपारी ४.३० पर्यंत मेगाब्लॉक चालणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा आणि मुलुंड धीमा मार्ग, हार्बरवर सीएसएमटी ते चुनाभट्टी-वांद्रे आणि चुनाभट्टी-वांद्रे ते सीएसएमटी मार्गावर ब्लॉक असेल.

Updated: Jul 23, 2017, 08:49 AM IST
मध्य आणि हार्बर मार्गावर ११ ते ४.३० पर्यंत मेगाब्लॉक title=

मुंबई : मध्य, हार्बर मार्गावर आज सकाळी ११ ते दुपारी ४.३० पर्यंत मेगाब्लॉक चालणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा आणि मुलुंड धीमा मार्ग, हार्बरवर सीएसएमटी ते चुनाभट्टी-वांद्रे आणि चुनाभट्टी-वांद्रे ते सीएसएमटी मार्गावर ब्लॉक असेल.

मध्य रेल्वेवर माटुंगा स्थानकातून सुटणाऱ्या डाऊन स्लो सेवा स. ११.१२ ते दु. ४.२७ मध्ये माटुंगा आ​​णि मुलुंडमध्ये डाऊन फास्ट मार्गावर चालतील. या लोकलना सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यानंतर या गाड्या मुलुंडहून पुन्हा डाऊन स्लोवर चालवल्या जातील. डाऊन स्लो लोकल विद्याविहार, कांजुरमार्ग, नाहूर स्थानकांवर थांबणार नाहीत. या स्थानकांकडे जाणाऱ्या प्रवाशांना कुर्ला-घाटकोपर-भांडुप-मुलुंड स्थानकांतून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.