मिलिंद नार्वेकर छगन भुजबळांना भेटले

नार्वेकर आणि भुजबळ यांच्यामध्ये सुमारे तासभर चर्चा झाली.

Updated: May 21, 2018, 01:51 PM IST

मुंबई : शिवसेना सचिव आणि उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांनी लीलावती रुग्णालयात उपचार घेणा-या छगन भुजबळ यांची भेट घेतलीय. नार्वेकर आणि भुजबळ यांच्यामध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. यावेळी त्यांच्यासोबत नाशिकमधले पक्षाचे पदाधिकारी दत्ता गायकवाडही होते. भुजबळ- नार्वेकर भेटीला सोमवारी नाशिकमध्ये होणा-या विधानपरिषद निवडणुकीची पार्श्वभूमीही असल्याचं बोललं जातंय. शिवसेनेचे नरेंद्र दराडे विरुद्ध राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे अशी ही लढत होतेय... नाशिकच्या राजकारणात भुजबळ यांचं अजूनही प्राबल्य आहे. त्यामुळे त्यांच्याकडून शिवसेनेला सहकार्याची अपेक्षा आहे.