Nita Ambani : यांची बातच न्यारी! नातवंडांना आणायला गेलेल्या नीता अंबानींनी स्वत:वर किती खर्च केला माहितीये ?

Nita Ambani Airport Look : भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अग्रस्थानी असणाऱ्या मुकेश अंबानी (Mukesh ambani) यांच्या कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे त्यांची नातवंड. 

Updated: Dec 27, 2022, 01:08 PM IST
Nita Ambani : यांची बातच न्यारी! नातवंडांना आणायला गेलेल्या नीता अंबानींनी स्वत:वर किती खर्च केला माहितीये ?  title=
Mukesh Ambani wife Nita Ambanis Latest Airport Look to pick daughter isha costs more than 2 lakhs

'Nani' Nita Ambani's Latest Airport Look : भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अग्रस्थानी असणाऱ्या मुकेश अंबानी (Mukesh ambani) यांच्या कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे त्यांची नातवंड. लेक ईशा अंबानी (Isha Ambani) तिच्या प्रसूतीनंतर काही दिवसांनी आता मायदेशी आणि स्वत:च्या घरी परतली आहे. तिच्या येण्यानं मुकेश अंबानी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ईशा अंबानी मुंबईत आली त्या क्षणी तिला आणण्यासाठी तिचं संपूर्ण कुटुंब गेल्याचं पाहायला मिळालं. या क्षणाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. 

नीता अंबानी (Nita Ambani) म्हणू नका, किंवा नातवंडांसाठी स्वत: कारच्या ड्रायव्हिंग सीटवर येणारे मुकेश अंबानी म्हणू नका. काय करु आणि काय नको, असंच सर्वांना वाटत होतं. हा क्षण तितका खास होताच. कारण, त्या दिवशी नातवंडांच्या स्वागतासाठी नीता अंबानी यांनीही स्वत:वर अमाप खर्च केला होता. त्यांचा एअरपोर्ट लूक हा विशेष चर्चेचा विषय ठरला. ज्यामध्ये त्यांच्या सँडल्सपासून आऊटफिटपर्यंत बऱ्याच गोष्टींवर नेटकऱ्यांच्या नजरा खिळल्या. 

नीता अंबानींचा लूक किती रुपयांचा होता माहितीये? 

कमरेपर्यंत येणारा नीता अंबानीचा टॉप हा शिफॉनपासून तयार करण्यात आला होता. हाय ओपन नेकलाईन असणाऱ्या या टॉपला लांब बाह्यांनी खास टच दिला होता. Misa या ब्रँडचा हा टॉप ऑनलाईन पाहिल्यास USD 310 इतक्या किमतीला मिळतो. भारतीय चलनानुसार त्याची किंमत Rs. 25,650 इतकी आहे. (Nita Ambani outfit cost)

Mukesh Ambani wife Nita Ambanis Latest Airport Look to pick daughter isha costs more than 2 lakhs

हेसुद्धा पाहा : Isha Ambani Anand Piramal : अंबांनी आजोबांच्या नातवंडांसाठी शाही थाट; पाहा स्वागताचा नेत्रदीपक सोहळा

नीता अंबानी यांनी या लूकला त्यांच्या लेदर स्लाईड सँडल्सची जोड दिली होती.  Valentino ब्रँडच्या या सँडल्सना 2.4 इंचांच्या हिल्स होत्या. त्यांची आखणी कमाल होती. त्यांची किंमत USD 910 म्हणजेच भारतीय चलनानुसार Rs. 75,296 इतकी होती. 

बॅगेची किंमत दीड लाखांपलीकडे... 

नीता यांनी त्यांच्या या लूकसोबत एक बॅगही कॅरी केली होती. त्यांच्या गार्डनं ही बॅग पकडली होती. Goyard या ब्रँडची ही बॅग सुरेख दिसत होती.  USD 1,984 इतक्या किमतीची ही बॅग भारतीय चलनानुसार Rs. 1,64,162 इतकी आहे. 

नीता अंबानी या कायमच एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा सोहळ्यानिमित्तानं हजेरी लावतात तेव्हा त्यांच्या फॅशन गोल्सनं सर्वांच्या नजरा वळवात. लेकिला विमानतळावर आणण्यासाठी गेल्याक्षणीसुद्धा त्यांचं असंच रुप पाहायला मिळालं. अतिशय कमी तरीही साजेशा लूकला त्यांनी यावेळी पसंती दिली होती. कमालीच्या प्रसन्न चेहऱ्यानं त्यांनी यावेळी माध्यमांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत त्याप्रती कृतज्ञताही व्यक्त केली. अंबानी कुटुंबाचा हाच स्वभाव अनेकांना हवाहवासा वाटतो.