मुकेश आणि निता अंबानींनी दिलं ईशा-आनंदला स्पेशल गिफ्ट

ईशा आणि आनंदला स्पेशल गिफ्ट

Updated: May 7, 2018, 12:58 PM IST
मुकेश आणि निता अंबानींनी दिलं ईशा-आनंदला स्पेशल गिफ्ट title=

मुंबई : भारतातीस सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशाचा विवाह पीरामल ग्रुपचे मालक अजय पीरामल आणि स्वाती पीरामल यांचा मुलगा आनंद सोबत होणार आहे. डिसेंबरमध्ये दोघांचा विवाह होणार आहे. रविवारी आनंदने ईशाला प्रपोज केलं होतं. दोन्ही कुटुंबांच्या सहमतीनंतर महाबळेश्वरमध्ये दोन्ही कुटुंबांनी एकत्र लंच केला. यानंतर मुंबईच्या इस्कॉन मंदिरात दोघांनी पूजा केली. अंबानी कुटुंबासाठी हा क्षण खूप खास होता. त्यांनी आपली मुलगी आणि जावई यांच्यासाठी एक स्पेशल कार्ड तयार केलं आणि दोघांना शुभेच्छा दिल्या.

का आहे स्पेशल कार्ड

मुकेश अंबानींच्या परिवारातील सगळ्या सदस्यांचं नाव या कार्डवर आहे. ईशा आणि आनंदचा फोटो यामध्ये फ्रेम केला गेला आहे. या कार्डवर एक खास मॅसेज देखील लिहिला आहे. 'सुंदर जोडीला शुभेच्छा'. या कार्डवर परिवारातील संपूर्ण सदस्यांची नावे आहेत.

मुकेश और नीता अंबानी ने ईशा-आनंद को दिया 'स्पेशल कार्ड', देखिए क्या लिखा

करोडोंची मालकीन

ईशा अंबानीचं नेट वर्थ 100 मिलियन डॉलर म्हणजेच 668 कोटी रुपये आहे. ईशा अंबानी जेव्हा 16 वर्षाची होती तेव्हा तिचं नाव फोर्ब्सच्या टॉप 10 कोट्याधीश उत्तराधिकाऱ्यांच्या लिस्टमध्ये दुसऱ्या स्थानावर होतं. तेव्हा रिलायंस इंडस्ट्रीजमध्ये ती 80 मिलियन डॉलरच्या शेयर्सची मालकीन झाली होती.