पतीबाबत चर्चा करायला क्लबमध्ये गेली अन्... मुंबईत महिला डॉक्टरवर बलात्कार

Mumbai Crime : मुंबईत एका महिला डॉक्टरावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

आकाश नेटके | Updated: Nov 16, 2023, 03:05 PM IST
पतीबाबत चर्चा करायला क्लबमध्ये गेली अन्... मुंबईत महिला डॉक्टरवर बलात्कार title=

Mumbai Crime : मुंबईत (Mumbai News) एका महिला डॉक्टरवर बलात्कार केल्याप्रकरणी एका 38 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.  या प्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात (Mumbai Police) बलात्कार आणि ब्लॅकमेलचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला पतीपासून वेगळी राहत होती. भेटण्यासाठी गेले असता बेशुद्ध करुन आरोपीने बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा अधिक तपास सुरु केला आहे. मैत्री करुन अत्याचार केल्याचे डॉक्टर महिलेने म्हटलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताडदेव परिसरातील एका क्लबमध्ये बॅडमिंटन खेळण्यादरम्यान आरोपीने आपल्यासोबत मैत्री केली होती असे पीडित महिलीने सांगितले. घरगुती कारणांमुळे महिला पतीपासून वेगळी एकटीच राहत होती. याचाच गैरफायदा घेत आरोपीने अत्याचार केल्याचे महिलीने तक्रारीत म्हटलं आहे. अत्याचारानंतर आरोपीने फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पैसे घेतले, असेही महिलेने तक्रारीत म्हटलं आहे.

महिलेच्या तक्रारीनुसार, बॅडमिंटन कोर्टवर मैत्री झाल्यानंतर पीडितीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आरोपीसोबत गप्पा मारण्यास सुरुवात केली. पतीसोबत राहत नसल्याची माहिती महिलेने आरोपीला दिली होती. 20 ऑगस्ट रोजी आरोपीने याच विषयावर चर्चा करण्यासाठी तिला भेटण्याची विनंती केली. त्यानंतर दोघेही मरीन ड्राईव्ह परिसरातील एका क्लबमध्ये भेटले. त्यावेळी आरोपीने कथितपणे तिच्या पेयामध्ये काहीतरी वस्तू घातली, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर, आरोपी तिच्यासोबत कारमधून पीडितेच्या घरी गेला. तिथेही दोघांनी मद्यपान केले. त्याचवेळी दारूच्या नशेत असतानाच आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याची माहिती महिलेने पोलिसांना दिली.

त्यानंतर आरोपीने ऑक्टोबरमध्ये महिलेकडे पैशांची मागणी केली. सुरुवातीला पीडितेने पैसे पाठवले. पण आरोपीची मागणी वाढत गेली त्यामुळे पीडितेने त्याला नकार दिला. त्यानंतर आरोपीने तिचा पती आणि मित्रांना व्हिडिओ, फोटो आणि चॅट्स पाठवण्याची धमकी दिली. तक्रारीनुसार पीडितीने आरोपीला थोडेथोडे करुन 3.33 लाख रुपये दिले होते. पण आरोपीची मागणी वाढत असल्याने महिलेचा संयम तुटला आणि तिने पोलिसांत धाव घेतली. पीडितेने गावदेवी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

 

पोलिसांनी आरोपीला भारतीय दंड संहिता कलम 376 (बलात्कार) आणि 384 (खंडणी) अंतर्गत अटक करण्यात केली आहे. आणि अधिका-याने सांगितल्यानुसार पुढील तपास सुरू आहे.