भांडुपमध्ये 'या' कारणामुळे तरुणाला अर्धनग्न करुन मारहाण, व्हिडीओ शूट केले व्हायरल

Bhandup Crime: भांडुपमध्ये एका तरुणाची अर्ध नग्न अवस्थेत धिंड काढून त्याला जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. भांडुपच्या रमाबाई नगर परिसरातील ही घटना आहे.

Updated: Oct 8, 2023, 08:03 AM IST
भांडुपमध्ये 'या' कारणामुळे तरुणाला अर्धनग्न करुन मारहाण, व्हिडीओ शूट केले व्हायरल title=

Bhandup Crime: भांडुपमध्ये तरुणाला अर्धनग्न मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी तरुणाला मारहाण करतानाचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियात व्हायरल केला आहे. यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणाला नागरिकांनी इतकी मारहाण का केली? काय आहे हे प्रकरण? सविस्तर जाणून घेऊया.

भांडुपमध्ये एका तरुणाची अर्ध नग्न अवस्थेत धिंड काढून त्याला जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. भांडुपच्या रमाबाई नगर परिसरातील ही घटना आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणाने विभागातील एका महिलेची छेड काढली होती. त्यानंतर या परिसरातील तरुणांनी मिळून त्याला अर्धंनग्न केलं आणि त्याला जबर मारहाण करत त्याचे चित्रीकरण केले.

या घटनेनंतर भांडुप पोलिसांनी या तरुणाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या तरुणाला मारहाण केलेल्या चार जणांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमध्ये हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे.

पत्नीसह वकिलाची हत्या करून कांदिवलीच्या नाल्यात फेकले

मुंबईतील (Mumbai Crime) सत्र न्यायालयाने चित्रकार चिंतन उपाध्याय (Chintn Upadhyay) याला पत्नी हेमा उपाध्याय (Hema Upadhyay) आणि त्यांचे वकील हरेश भंभानी (Harish Bhambhani) यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. तर या प्रकरणातील अन्य आरोपी विजय राजभर, प्रदीप राजभर आणि शिवकुमार राजभर यांना दोघांच्या खुनाच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले आहे. हेमा उपाध्याय आणि वकील हरेश भंबानी यांची आठ वर्षांपूर्वी हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता या प्रकरणात हेमा यांचे पती चिंतन उपाध्याय याला दोषी ठरवण्यात आलं आहे.

हेमा उपाध्याय आणि हरेश भंभानी यांची 11 डिसेंबर 2015 रोजी हत्या झाली होती. मुंबईतील कांदिवली परिसरातील एका नाल्यात पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये दोघांचेही मृतदेह ३सापडले होते. त्यानंतर उपनगरीय दिंडोशी न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.वाय. भोसले यांनी चिंतन उपाध्यायला त्याची पत्नी आणि तिच्या वकिलाच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. प्रकरणाच्या सुरुवातीपासून मुंबई पोलिसांना यात कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा संशय होता. हेमाचे चिंतन उपाध्यायसोबत भांडण झाले होते. घटस्फोटाबाबत दोघांमध्ये कायदेशीर खटला सुरू होता.