वाटेतला काटा बाजुला केला ! प्रेयसीच्या पतीची हातोड्यानं हत्या, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी 26 वर्षीय तरुणानं...

Mumbai Crime News  : मुंबईत आणखी एक हत्या. प्रेयसीच्या पतीची हातोड्याने प्रियकराने हत्या केल्याचे उघड झाले आहे. हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या 26 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. अनैतिक संबंधावरुन मित्राची हत्या केल्याचे पुढे आले.

Updated: Jun 8, 2023, 10:01 AM IST
वाटेतला काटा बाजुला केला ! प्रेयसीच्या पतीची हातोड्यानं हत्या, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी 26 वर्षीय तरुणानं... title=
Mumbai Crime News

Mumbai Crime News  : बोरिवलीत धक्कादायक घटनेची माहिती समोर आली आहे. प्रेयसीच्या पतीची हातोड्याने प्रियकराने हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या 26 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. सुरेश कुमावत असे या आरोपीचे नाव आहे. सुरेश याने प्रेयसीच्या पतीची हत्या केल्यानंतर बनाव रचला. आपला गुन्हा उघड होऊ नये म्हणून त्याने पीडितेच्या पालकांना तो (दिनेश प्रजापती) आत्महत्या करणार असल्याचा व्हिडिओ आणि मेसेज पाठवला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

 दिनेश प्रजापती (38) याच्या पत्नीशी असलेल्या संबंधावरुन त्याचा मित्र सुरेश कुमावत (26) याने हातोडा मारुन हत्या केली. त्यानंतर तो  बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवलीत. संशयाची सुई मित्राकडे गेली. पोलिसांनी सुरेशकडे चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सुरेश याने  मित्र  दिनेश प्रजापती याची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह पुरला आणि पीडितेच्या पालकांना तो  आत्महत्या करणार असल्याचा व्हिडिओ आणि संदेशही पाठवला. अशी माहिती मुंबई पोलीस डीसीपी स्मिता पाटील यांनी दिली. Mira Road Murders : भयंकर ! महिलेचे तुकडे करुन कुकरमध्ये शिजवले आणि कुत्र्यांना खाऊ घातले...

मृतदेह काशिमीरा येथे नेऊन पुरल्याप्रकरणी  सुरेश कुमावत या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.  सुरेश कुमावत याने पीडित दिनेश प्रजापतीच्या फोनवरुन त्याच्या नातेवाइकांना प्रजापतीने आत्महत्येचा कट रचल्याचा संदेश पाठवला, असे पोलीस तपासात माहिती पुढे आली. दरम्यान, या हत्येच्या तपासासाठी पोलिसांनी 50 हून अधिक कॅमेर्‍यांचे सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. तसेच कुमावतला अटक करण्यासाठी कॉल रेकॉर्डची नोंदही घेतली. त्यानंतर तपासाला गती मिळाली आणि दिनेश याचा मित्र सुरेश याला ताब्यात घेतले. अधिक चौकशी केल्यानंतर त्याने हत्येची कबुली दिली.

दोघांमध्ये वाद झाला आणि हातोडा डोक्यात घातला...

प्रजापती हा स्नॅक्सचा स्टॉल चालवत होता. तर सुरेश कुमावत हा व्यवसायाने सीसीटीव्ही तंत्रज्ञ होता. आपल्या पत्नीचे कथितपणे विवाहबाह्य संबंध असल्याचे त्याला समजले होते. 1 जून रोजी त्याने सुरेश कुमावत याला फोन करुन बोलावले. त्यानंतर बोरिवली (पूर्व) येथील राजेंद्र नगर येथील एका चाळीत दोघांची भेट झाली. कुमावत याच्याकडे एका खोलीची चावी होती. ती खोली त्याच्या मित्राच्या मालकीची होती. येथे बोलत असताना दोघांमध्ये वाद झाला. यावेळी सुरेश कुमावत याने प्रजापती यांच्या डोक्यात हातोडा मारला आणि गंभीर जखमी केले. तेथून तो पळून गेला.

दरम्यान, बोरिवली (पूर्व) येथे  दोघे मोटारसायकलवरुन आले होते. हे चाळीबाहेरील कॅमेऱ्यांनी कैद केले होते. हत्या केल्यानंतर कुमावत प्रजापतीच्या दुचाकीवरुन निघून गेला. त्याने प्रजापतीची दुचाकी घोडबंदर रोडवर फेकून दिली आणि बोरिवली चाळीकडे परत येताना बारदान खरेदी केले. पुढच्या काही तासांत त्याने प्रजापती याच्या  मृतदेहाचे बारीक तुकडे केलेत आणि ते पोत्यात भरलेत. संध्याकाळी 7.30 च्या सुमारास, कुमावतने मृतदेह उचलला आणि बाईकवरुन घेऊन काशिमीरा येथील जंगली भागात गेला. जिथे त्याने झाडे लावण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात त्याने मृतदेह एका ठिकाणी पुरला, मातीने झाकून एक झाड लावले.

त्यानंतर रात्री कुमावतने प्रजापतीचा फोन वापरुन घोडबंदर रोडच्या आसपास व्हिडिओ शूट केला. त्याने मारवाडीतील छोट्या नोटसह व्हिडिओ प्रजापतीच्या नातेवाईकांना व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवला. नोटमध्ये म्हटले आहे की प्रजापतीने एक वर्षापूर्वी गंभीर चूक केली होती आणि सर्वांना निरोप द्यायचा होता. त्यानंतर कुमावत यांनी फोन नष्ट केला. 

दरम्यान, पोलिसांना व्हिडिओ आणि व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आला, ज्यामध्ये प्रजापती आत्महत्येची योजना आखत असल्याचे सूचित करण्यात आले. घोडबंदर रोड येथे व्हिडिओ शूट करण्यात आला होता आणि 1 जूनच्या रात्री प्रजापतीने बोरिवली येथील चाळ सोडली नव्हती. सतत चौकशी केल्यानंतर कुमावतने प्रजापतीची चाळीत हत्या करुन मृतदेह काशिमीरा येथे पुरल्याचे कबूल केले, असे पोलिसांनी सांगितले.

प्रजापतीच्या भावाने 2 जून रोजी समता नगर पोलिसात हरवल्याची तक्रार नोंदवली. अधिकाऱ्यांनी सीसीटीव्हीचे पाहणी केली आणि कुमावत आणि प्रजापती यांना बोरीवली येथील चाळीत एकत्र प्रवेश करताना दिसले. प्रजापतीच्या फोनवरुन शेवटचा फोनही कुमावत याच्याशीच झाला होता, त्यामुळे पोलिसांनी त्याला मंगळवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले. आमच्या टीमची दिशाभूल करण्यासाठी त्याने बनाव रचला. प्रजापती समुद्रात पडून बुडाल्याचे कुमावत याने सांगितले. अशी माहिती डीसीपी स्मिता पाटील सांगितले.