Mumbai Local : लोकल रेल्वेच्या प्रवाशांसाठी खूशखबर; आता थेट गोरेगाव ते पनवेल

लोकल रेल्वेने (Local Train) प्रवास (Travel) करणाऱ्यासाठी प्रवाशांसाठी (Passengers) एक चांगली बातमी आहे.  

Updated: Dec 1, 2021, 12:32 PM IST
Mumbai Local : लोकल रेल्वेच्या प्रवाशांसाठी खूशखबर; आता थेट गोरेगाव ते पनवेल title=
संग्रहित छाया

मुंबई : Mumbai Local Train : लोकल रेल्वेने (Local Train) प्रवास (Travel) करणाऱ्यासाठी प्रवाशांसाठी (Passengers) एक चांगली बातमी आहे. गोरेगाव ते पनवेल थेट लोकल सेवा आजपासून सुरू झाली आहे. दिवसभरात एकूण 18 फेऱ्या होणार आहेत. हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना हा मोठा दिलासा आहे. पनवेल ते अंधेरी सेवेचा विस्तार गोरेगावपर्यंत करण्यात आला आहे.  आजपासून अंधेरी- पनवेल - अंधेरी अशा 18  फेऱ्या गोरेगाव - पनवेल- गोरेगाव अशा होणार आहेत. (Mumbai Local: Good news for local train passengers; Now directly from Goregaon to Panvel)

गोरेगावकडून थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि पनवेलला (Panvel) जाण्याचा प्रवास करणे सोपे झाले आहे. आता गोरेगाव (Goregaon) ते पनवेल आणि गोरेगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) लोकल रेल्वेच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. 

दरम्यान, पश्चिम लाईनच्या प्रवाशांना पनवेल जाण्यासाठी वडाळा किंवा अंधेरी किंवा कुर्ला येथे रेल्वे बदलण्याची गरज राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जाण्यासाठीही गाड्या बदलण्याची गरज आता भासणार नाही. गोरेगाववरुन दादर किंवा अंधेरीला रेल्वे बदलावी लागत होती.  

  दरम्यान सीएसएमटी आणि गोरेगावच्य दरम्यान रेल्वेच्या 42 फेऱ्या होत आहेत. आता त्याचा विस्तार करत त्यांना गोरेगावपर्यंत वाढविण्यात आले आहे. याशिवाय सीएसएमटी आणि बांद्रापर्यत धावणाऱ्या दोन गाड्यांचा प्रवास गोरेगावपर्यंत करण्यात आला आहे.  पश्चिम-मध्य आणि पश्चिम-हार्बर मार्गांच्या थेट कनेक्टिव्हिटीमुळे प्रवाशांना आराम मिळणार आहे.