Mumbai Local Mega Block : पोरांना सुट्टी व पाहुणे पण आलेत, घराबाहेर पडणार असाल तर लोकलचं वेळापत्रक पाहून घ्या नाहीतर...

Mumbai Local Mega Block : पोरांना सुट्टी व पाहुणे पण आलेत, घराबाहेर पडणार असाल तर लोकलचं वेळापत्रक पाहून घ्या नाहीतर...

नेहा चौधरी | Updated: May 12, 2024, 09:09 AM IST
Mumbai Local Mega Block : पोरांना सुट्टी व पाहुणे पण आलेत, घराबाहेर पडणार असाल तर लोकलचं वेळापत्रक पाहून घ्या नाहीतर... title=
mumbai local mega block on central harbour and western railway line on sunday 12 may

Mumbai Local Mega Block : मे महिना सुरु झाल्यामुळे मुलांच्या शाळेंना सुट्ट्या लागल्या आहेत. शिवाय अनेकांकडे पाहुणे आले आहेत. आज त्यात मदर्स डेचा उत्साह आहे. अशात तुम्ही रविवारची सुट्टी म्हणून घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल तर मुंबईकरांचे नाहक हाल होऊ शकतात. कारण लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक रविवारचा घेण्यात येतो. त्यामुळे अशा स्थितीत लोकलने प्रवास करण्यापूर्वी रविवार 12 मे चं लोकलचं वेळापत्रक जाणून घ्या. 

मध्य रेल्वे मार्गावरील किती वाजेपर्यंत मेगा ब्लॉक ?

तुम्ही जर मध्य रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर माटुंगा – मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 3.10 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. या वेळेमध्ये सीएसएमटीहून ठाण्याकडे सुटणाऱ्या आणि सीएसएमटीहून जाणाऱ्या अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा – मुलुंड स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल सेवा 15 मिनिटं उशिराने धावणार आहे. 

हार्बर रेल्वे मार्गावर काय परिस्थिती असेल?

हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. हा मेगाब्लॉक सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत असणार आहे. या ब्लॉक काळात सीएसएमटी ते वाशी / बेलापूर / पनवेल अप आणि डाऊन लोकल रद्द असणार आहेत.

मात्र ब्लॉक काळात सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल – वाशी यादरम्यान विशेष लोकल धावणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्ये ठाणे, वाशी, नेरूळ रेल्वे स्थानकांदरम्यान प्रवास करण्याची मुभा रेल्वेकडून देण्यात आली आहे. 

पश्चिम रेल्वे मार्गावरील रविवारचं वेळापत्रक 

आज रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावरील सांताक्रूझ – गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक असणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक असणार आहे. या काळात सांताक्रूझ – गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील धीम्या लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या लोकल विलेपार्ले आणि राम मंदिर स्थानकावर थांबणार नाहीत. त्याचबरोबर ब्लॉक काळात पश्चिम रेल्वे मार्गावरील काही लोकल रद्द केल्या आहेत.