रिक्षा - टॅक्सीची भाडेवाढीसाठी चालक आक्रमक

 पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनंतर सीएनजी आणि पीएनजीतही वाढ झाली. त्यामुळे रिक्षा - टॅक्सी चालकांनीही भाडेवाढीची मागणी होत आहे.

Updated: Dec 21, 2021, 10:45 AM IST
रिक्षा - टॅक्सीची भाडेवाढीसाठी चालक आक्रमक title=
संग्रहित छाया

मुंबई : महागाईत दिवसागणिक वाढ होत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनंतर सीएनजी आणि पीएनजीतही वाढ झाली. त्यामुळे रिक्षा - टॅक्सी चालकांनीही भाडेवाढीची मागणी केली आहे. सध्या रिक्षाचे भाडे 21 रुपये आहे. तर टॅक्सीचे 25 रुपये आहे. यात पाच रुपयांची वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सीएनजी महागल्याने चालकांची भाडेवाढीची मागणी केली आहे. टॅक्सीचे किमान भाडे 30 रुपये तर, रिक्षाचे भाडे 25 रूपये करावे, असे चालकांचे म्हणणे आहे. दरम्यान, रिक्षा - टॅक्सी भाडेवाढ झाल्यास प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

मुंबईत सीएनजीचे भाव वाढल्याने रिक्षा - टॅक्सी चालक नाराज आहेत. त्यामुळे चालकांनी टॅक्सी दरात पाच रूपये वाढ तर, रिक्षाचे किमान भाडे 25 रूपये करण्याची मुंबई - टॅक्सीमेन्स युनियनने केली आहे. 

फेब्रुवारीत 3 रुपये भाडेवाढीला मान्यता

2021च्या दुसऱ्या महिन्यात अर्थात फेब्रुवारीत मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात तीन रुपयांची वाढ करण्यात आली होती. रिक्षाचे भाडे 18 रुपयांवरुन 21 रुपये तर टॅक्सीचे भाडे 22 रुपयांवरुन 25 रुपये झाले होते. मुंबई एमएमआर रिजनमध्ये ही भाडेवाढ लागू करण्यात आली. याबाबतची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. ही भाडेवाड 1 मार्चपासून लागू करण्यात आली होती. आता इंधन दरवाढ आणि इंधन गॅसवाढीमुळे पुन्हा भाडेवाढीची मागणी करण्यात येत आहे.

मुंबईत रिक्षाच्या पहिल्या टप्प्याला 18 रुपयांऐवजी 21 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यापुढील प्रत्येक किलोमीटरला 14.20 पैसे मोजावे लागत. 1 मार्च 2021 पासून ही भाडेवाढ लागू झाली होती. आता पुन्हा मागणी होत असल्याने प्रवाशांना मोठा फटका बसरणार आहे.