मुंबईत या बाईने घरातील किचनला स्मशानभूमी बनवून टाकलं...अखेर सत्याचं भूत बाहेर आलं

प्रेमात लोकं इतकी वाहून जाताता की, चांगलं वाईट यातील फरक ओळखण्याची बुद्धीही लोकं हरवून बसतात.

Updated: Jun 2, 2021, 08:00 PM IST
मुंबईत या बाईने घरातील किचनला स्मशानभूमी बनवून टाकलं...अखेर सत्याचं भूत बाहेर आलं title=

मुंबई  : प्रेमात लोकं इतकी वाहून जाताता की, चांगलं वाईट यातील फरक ओळखण्याची बुद्धीही लोकं हरवून बसतात. ही महिला आपल्या प्रियकराच्या प्रेमात इतकी वेडी झाली की, तिने चक्कं आपल्या नवऱ्यालाच मारुन टाकले. एवढेच नाही तर या महिलेने आपल्या प्रियकरासोबत मिळून स्वत:च्या घरी किचनमध्ये खड्डा केला आणि आपल्या नवऱ्याच्या मृतदेहाला तेथे गाडले. परंतु हे सगळ करत असताना या महिलेच्या 6 वर्षाच्या मुलीने पाहिले आणि याबद्दल तिने तिच्या काकांना सांगितले, ज्यामुळे ही महिला पकडली गेली आहे. पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे, परंतु तिचा प्रियकर सध्या फरार आहे.

रइस शेख असे या मृत व्यक्तीचे नाव आहे आणि तो मुंबईच्या दहिसर पूर्वी येथील रावलपाडा येथे राहायचा. खूप दिवसापासून रइस शेख बेपत्ता असल्याचो लक्षात येताच त्याच्या मित्राने 25 मे ला पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी शोध घ्यायला सुरवात केली परंतु पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही.

त्यांनंतर काही दिवसांनी रइस शेखच्या भावाला ही बातमी कळताच त्याने देखील आपल्या भावाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या समोर जे सत्य आले ते ऐकून त्याला विश्वासच बसत नव्हता. खरेतर 6 वर्षाच्या त्या मुलीने आपल्या काकाला सांगितले की, तिच्या आईनेच वडीलांना मारुन किचनमध्ये गाडले आहे.

त्यामुलीने तिच्या काकाला सांगितले की, आई आणि एका माणसाने तिच्या वडीलांना धार धार शस्त्राने मारले आणि किचनमध्ये खड्डाकरुन त्यांना त्याच्यात पुरले.

या महिलेने आपल्या नवऱ्याच्या मृतदेहाला खड्यात पुरल्यानंतर त्या खड्य़ाला भरले आणि त्याला वरुन टाईल्स लावल्या, जेणे करुन कोणालाही संशय येऊ नये आणि ती अशी रहात होती की, जसे काही झालेच नाही.

यासगळ्या गोष्टींचा भांडाफोड होताच त्या महिलेला अटक केले गेले. परंतु तिचा प्रियकर अजूनही फरार आहे. दहिसर पोलिस ही केस सांभाळत आहे आणि याचा पुढील तपास सुरु आहे.